Lokmat Agro >स्मार्ट शेती > Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Magel Tyala Solar scheme If you pay for solar scheme, will you get solar see details | Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर 

Magel Tyala Solar : सोलर योजनेत पेमेंट (Solar Yojana Payment) केलेल्या शेतकऱ्यांना अर्जाची छाननी होत असताना काही त्रुटी दिसून येत आहेत.

Magel Tyala Solar : सोलर योजनेत पेमेंट (Solar Yojana Payment) केलेल्या शेतकऱ्यांना अर्जाची छाननी होत असताना काही त्रुटी दिसून येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट (Solar Yojana Payment) केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची छाननी होत असताना काही त्रुटी दिसून येत आहेत. त्रुटी दिसून आल्याने पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. याच अनुषंगाने अनेक शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत. आम्ही पेमेंट केले आहे, तर आता अडचण काय? नेमकं या योजनेमध्ये कशाप्रकारे अंमलबजावणीची प्रक्रिया आहे. पेमेंट केलं तर सोलर (Solar Yojana) मिळतो का? पेमेंट केलेल्या प्रत्येकाला सोलर मिळतो का? पेमेंट केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते, हे सर्व थोडक्यात समजून घेऊयात. 

अर्ज केल्यांनतर अर्जाची छाननी करत असताना जर काही समस्या दिसून आल्या तर ते शेतकऱ्याला कागदपत्र अपलोड करायला सांगितले जाते. कागदपत्र अपलोड झालेल्या अर्जाला पेमेंटच्या (Magel Tyala solar Arj) ऑप्शन दिला जाते. आणि त्याच्या नंतर मागणी केल्याबरोबर डिमांड भरायला सांगितले जाते.  म्हणजे केलेला अर्ज समजा तर तुम्ही अर्ज केलाय आणि अर्जाची जर स्थिती तुम्ही जर एम के आयडी टाकून जर पाहिले तर तुम्हाला तुमचा अर्ज फक्त आता ड्राफ्ट मोडमध्ये आहे. त्यात स्वरूपात आहे, म्हणजे तो ड्राफ्ट स्वरूपामध्ये सेव केलेला तो आणखीन सबमिट झालेला नाही असं दाखवा. 

जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचा पर्याय दिला जाईल. आपण अर्ज केल्यानुसार पेमेंट करावे लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर मग लगेच सोलर मिळतो का किंवा सोलर मिळणारच का? पुन्हा व्हेंडर निवड येते का? योग्य असलेल्या अर्जाला व्हेंडर निवड पर्याय दिला जातो. ज्या अर्जात काहीच अडचणी असतील, जसे कि, पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसेल, आधार कार्ड नाव, सातबारा नाव बदल असेल, सामायिक जमीन असेल तर सामायिक संमती पत्र जोडलेले नसेल, अशी वेगवेगळे कारणे दिली जातात. अशा अर्जातून त्रुटी काढली जाते. 

व्हेंडरची निवड 

जर तुमचा अर्ज अशा अडचणीत सापडला असेल, तुम्हाला कागदपत्रे री अप्लाय करण्यास सांगितले जाते. म्हणजेच तुमचा अर्ज पुन्हा पुढे पाठवायचा असल्यास तुम्हाला विचारणा केली जाते. जेणेकरून पुढच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाईल, म्हणजे पेमेंट केल्यानंतर सुद्धा पूर्ण तपासणी झाल्यानंतरच अर्ज पुढे जाणार आहे. यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज मंजूर होईल, अर्ज सबमिट झालेला असेल, शिवाय पेमेंट झाल्याचेही दाखवले जाईल. आता एवढं सगळं झालं म्हणजे पुन्हा सोलर मिळणार का नाही? याच्यानंतर पुढची प्रक्रिया असते, ते म्हणजे व्हेंडर निवड. ज्या लाभार्थ्यांना सोलर पेमेंट केलेले अशा लाभार्थ्यांना पुढे पुरवठादाराची निवड करण्यासाठी सांगितलं जाते.

जॉईंट सर्वेक्षण 

यानंतर कंपनीच्या माध्यमातून जॉईंट सर्वेक्षण केले जाते. ही प्रक्रिया सोलर इन्स्टॉलेशन होण्यापूर्वी केली जाते. यात सोलर कंपनीचे प्रतिनिधी, एमएसईबीचे कर्मचारी आणि शेतकरी मिळून जॉईंट सर्वेक्षण केले जाते. यावेळी अनेक बाबी तपासल्या जातात. यातही काही अडचण आली तर पुन्हा अर्ज होल्डवर जाण्याची शक्यता असते. तात्काळ सुटणाऱ्या त्रुटी असतील तर प्राधान्याने सोडवल्या जातात. जॉईंट सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनीच्या माध्यमातून साहित्य पाठवले जाते. आणि सोलरचे इन्स्टॉलेशन केले जाते. 

सोलर इन्स्टॉलेशन नंतर.... 

इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्या लाभार्थ्यासहित त्या सोलरचा फोटो किंवा इन्स्टॉल केलेला सोलरचा फोटो हा सबमिट केला जातो. कंपनीचे एक सोलर लागल्याचा एक रिपोर्ट काउंट केला जातो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन लाख सोलर पंप इन्स्टॉल झाले आहेत. यानंतर अधिकारी भेट देतात, सोलर व्यवस्थांची इंस्टाल झाल्याची तपासणी केली जाते. शेतकऱ्याला पुढे सोलर वापरण्याची मुभा दिली जाते. अशा प्रकारे सोलर योजनेत वेगवगेळ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 

Web Title: Latest News Magel Tyala Solar scheme If you pay for solar scheme, will you get solar see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.