Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी (Magel Tyala Solar Pump) शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया शुल्क भरले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता वेंडर निवडीचा (Vender Option) पर्याय उपलब्ध झाला आहे. या लेखात वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.
वेंडर निवडीचा पर्याय
ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेचे अर्ज भरले आहेत. तसेच अर्ज भरल्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे. पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्ज सबमिट झाला आहे, अशा शेतकऱ्यांना आता वेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रथम टप्प्यात 14 वेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार वेंडर निवडता येणार आहे.
वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी?
- सर्वप्रथम महावितरणच्या या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/faq.php अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
- महावितरणच्या पोर्टलवर जाऊन “लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा.
- लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची सद्यस्थिती तपासा.
- आपला अर्ज क्रमांक टाका. आपल्या एमटी आयडी / एमएस आयडी / एमके आयडी या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.
- त्यांनतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.
- यानंतर वेंडर निवड करा
- वेंडर निवडीसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल. आपल्याला तीन एचपी, पाच एचपी, किंवा साडेसात एचपी क्षमतेसाठी वेंडर निवडता येईल.
- तुमच्या जिल्ह्यात जिथे वेंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
- वेंडर निवडून असाइन या बटनावर क्लिक करा
- तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून Assign Vendor पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा
- वेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल, जो सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमच्या जिल्हात त्या vendor ने कसे काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे, ती सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
- वरील सर्व प्रोसेस केल्यावर तुमची vendor selection होणार आहे.
Solar Pump Yadi : अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर