Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

Latest news Learn in detail how to prepare the soil for summer tomato cultivation. | Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करावी, जाणून घ्या सविस्तर 

Unhali Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवड करत असाल तर काय काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात..

Unhali Tomato Lagvad : उन्हाळी टोमॅटो लागवड करत असाल तर काय काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात..

Unhali Tomato Lagvad :   शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून घ्यावेत. टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.

  • पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः एक आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी. म्हणजे रोपे कणखर होतात.
  • लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. 
  • त्यामुळे रोपांची मुळे न तुटता पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सें.मी. उंच व साधारण ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत.
  • लागवडीसाठी योग्य वाढीची सशक्त रोपे निवडावीत. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व
  • पातळ खोड असणारी तसेच रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरू नयेत.
  • पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मि.ली. अधिक मेटॅलॅक्झिल एम (३१.८ इएस) ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १०-१५ मिनिटे बुडवून घ्यावीत. नर्सरीमधून
  • आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी.
  • दोन रोपांत साधारण ३० सें.मी. आणि सरीत ९० सें.मी. अंतर ठेवून टोमॅटो रोपांची लागवड करावी. 
  • रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात.
  • लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.
  • लागवडीनंतर दहा दिवसांनी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावावीत.
  • रबी हंगामातील टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असल्यास खुरपणी करून शेत स्वच्छ करावे व खताची मात्रा द्यावी. 
  • टोमॅटो पिकास आधार देण्याचे काम पूर्ण करावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 
 

Web Title : ग्रीष्मकालीन टमाटर की खेती के लिए भूमि कैसे तैयार करें: विस्तृत गाइड

Web Summary : क्यारियां बनाकर और 25-30 दिन पुराने पौधों को रोपने से पहले सिंचाई करके भूमि तैयार करें। जड़ों को कीटनाशक/कवकनाशी से उपचारित करें, पंक्तियों में 90 सेमी की दूरी पर 30 सेमी की दूरी पर पौधे लगाएं और पानी दें। 10 दिनों के बाद मृत पौधों को बदलें।

Web Title : Prepare land for summer tomato cultivation: A detailed guide.

Web Summary : Prepare the land by creating beds and irrigating before transplanting 25-30 day old saplings. Treat roots with insecticide/fungicide, plant 30 cm apart in rows 90 cm apart, and water. Replace dead saplings after 10 days.