Lokmat Agro >स्मार्ट शेती > Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर 

Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर 

Latest News Lasun Karpa Management Control of Borer and Aphid on Garlic Crop, read in detail  | Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर 

Lasun Karpa Management : असे करा, लसूण पिकावरील करपा आणि फुलकिडीचे नियंत्रण, वाचा सविस्तर 

Lasun Crop Management : आजच्या लेखातून लसूण पिकावरील कीड आणि रोगांचे नियंत्रण (Lahsun Crop Management) कसे करावे, हे जाणून घेऊया...! 

Lasun Crop Management : आजच्या लेखातून लसूण पिकावरील कीड आणि रोगांचे नियंत्रण (Lahsun Crop Management) कसे करावे, हे जाणून घेऊया...! 

शेअर :

Join us
Join usNext

Lasun Karpa Management : लसूण उत्पादनावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी रोग व किडींचा (Lasun Karpa Management) उपद्रव का प्रमुख घटक आहे.  आजच्या लेखातून लसूण पिकावरील कीड आणि रोगांचे नियंत्रण (Lahsun Crop Management) कसे करावे, हे जाणून घेऊया...! 

करप्याचा प्रादुर्भाव झाल्यास... 

  • लसुणावर प्रामुख्याने करप्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. 
  • पिवळसर तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानावर बाहेरील भागावर दिसू लागतात. 
  • चट्टयांचा आकार वाढत जाऊन पाने सुकु लागतात. 
  • १५ ते २० सेंटीग्रेड तापमान व ८०-९० टक्के आर्द्रता यामुळे बुरशीची वाढ झपाटयाने होते. 
  • फेब्रुवारी मार्च महिन्यात पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असल्यास या रोगास फारच पोषक ठरते.

 

फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास... 

  • लसुण पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही कीड आकाराने लहान असते. 
  • त्याचा रंग पिवळसर तपकिरी असतो व त्याच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. 
  • या किडीचे पिले व प्रौढ कीटक पानातील रस शोषून घेतात. 
  • किडींनी असंख्य चावे घेतल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके पडतात. 
  • असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होतात व वाळतात. 

 

करता येणाऱ्या उपाययोजना 

फुलकिडे यांनी केलेल्या जखमांमधुन करपा रोगाच्या बुरशीस सहज शिरकाव करता येतो. जेव्हा जेव्हा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा रोगाचे प्रमाण देखिल वाढते. कोरडी हवा आणि २५ ते ३० सेंटीग्रेड तापमानात या किडीचे प्रमाण जास्त असते व असे हवामान फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात उपलब्ध असते. वेळीच नियंत्रण न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

करपा व फुलकिडी यांच्या एकत्रित रोग व किड नियंत्रणासाठी लक्षणे दिसताच १५ दिवसाच्या अंतराने चार फवारण्या मॅन्कोझेब (०. ३%) किंवा कार्बेन्डॅझिम (०.१%) हे बुरशीनाशक व डायमेथोएट ३० ईसी १२ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रती १० लिटर प्रमाणे कीटकनाशकाच्या आलटुल पालटून फवारण्या कराव्यात, फवारणी करतांना चिकट द्रवाचा (०.१%) वापर जरुर करावा.

- डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील 
कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक 

Web Title: Latest News Lasun Karpa Management Control of Borer and Aphid on Garlic Crop, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.