Join us

Krushi Salla : सोयाबीन, ज्वारी, ऊस, फळबाग शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा विशेष सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:55 IST

Krushi Salla : मराठवाड्याच्या सध्या मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहूनच करावीत तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा विशेष सल्ला जाणून घ्या सविस्तर (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्याच्या सध्या मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. (Krushi Salla)

फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहूनच करावीत तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा विशेष सल्ला जाणून घ्या सविस्तर (Krushi Salla)

हवामान अंदाज व चेतावणी

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे.   आज (१७ ऑगस्ट) रोजी नांदेड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जना व हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या (१८ ऑगस्ट) रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पाऊस तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान सारांश 

१८ ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून पुढील ४–५ दिवसांत कमाल तापमानात २–४ अंश सेल्सिअसने घट, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.

सामान्य कृषी सल्ला

मुसळधार पावसामुळे शेतात व फळबागेत पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी.

अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फवारणीची कामे २ दिवस टाळावीत किंवा पावसाची उघडीप बघूनच करावीत.

पीक व्यवस्थापन

सोयाबीन

अतिरिक्त पाणी साचू देऊ नये.

पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी :

५% निंबोळी अर्क / अझाडिरेक्टिन १५०० PPM फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त असल्यास शिफारसीतील रासायनिक कीटकनाशके आलटून-पालटून वापरावीत.

पांढरी माशी : प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.

पिवळा मोझॅक रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

खरीप ज्वारी

अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% किंवा स्पिनेटोरम ११.७% एससी फवारणी करावी.

बाजरी

शेतात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.

ऊस

पांढरी माशी व पाकोळी 

लिकॅनीसिलियम लिकॅनी (जैविक बुरशी) फवारणी करावी.

रासायनिक पर्याय : क्लोरोपायरीफॉस / इमिडाक्लोप्रिड / ॲसीफेट.

पोक्का बोइंग रोग :

कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड फवारणी.

हळद

अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

पानावरील ठिपके व करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब.

कंदमाशी नियंत्रणासाठी क्विनालफॉस किंवा डायमिथोएट आलटून पालटून वापरावेत.

फळबाग व्यवस्थापन

संत्रा/मोसंबी 

पाण्याचा निचरा करावा.

किडींकरिता डायकोफॉल फवारणी.

फळवाढीसाठी ००:५२:३४ खत + जिब्रॅलिक ॲसिड फवारणी.

डाळींब 

अतिरिक्त फुटवे काढावेत.

१९:१९:१९ खत सूक्ष्म सिंचनाद्वारे द्यावे.

चिकू 

पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी.

काढणीस तयार पिके लगेच काढावीत.

शेंडा व फळ पोखरणारी अळी 

प्रादुर्भावग्रस्त फळे नष्ट करावीत.

कामगंध सापळे / शिफारसीतील कीटकनाशकांचा वापर करावा.

भेंडीवरील पावडरी मिल्ड्यू रोगासाठी मायक्लोब्यूटॅनिल फवारणी.

फुलशेती

पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.

काढणीस तयार फुलांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

योग्य आकाराचे संगोपन गृह ठेवावे.

प्रति एकर ५ पिल्ले पालन करून दरवर्षी १० क्विंटल कोष उत्पादन शक्य.

योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकर ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्यात कोंबडी व शेळ्यांना नियमित लसीकरण करावे.

शेळ्यांसाठी निवारा असलेले शेड बांधावे.

शेडमध्ये स्वच्छता व जैवसुरक्षा काटेकोर पाळावी.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Management : कपाशीला पावसाचा फटका; कीड व रोगांवर तातडीचे उपाय करा

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापनमराठवाडाशेतकरीशेतीसोयाबीनज्वारी