Join us

Krushi Salla : सद्यस्थितीतील पीक व्यवस्थापन कसे कराल; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:18 IST

Krushi Salla : मराठवाड्यात सध्या वादळी वारे, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या बदलत्या हवामानामुळे सोयाबीन, हळद, ऊस, फळबाग आणि भाजीपाल्यावर धोका संभवतो. तसेच पशुधनात रोगराई वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन पिकांचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  आज (३० ऑगस्ट) रोजी वादळी वारे (३०–४० किमी/ताशी), मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Krushi Salla)

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके, जनावरे व शेतातील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. (Krushi Salla)

हवामान अंदाज

३० ऑगस्ट रोजी संभाजीनगर, जालना, परभणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल.

३१ ऑगस्ट - १ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील.

२ सप्टेंबर रोजी काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल.

पिकांसाठी मार्गदर्शन

सोयाबीन

शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, निचरा व्यवस्था नीट ठेवा.

पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी दिसल्यास शिफारस केलेली कीटकनाशके आलटून-पालटून फवारणी करा (पावसाची उघडीप बघावा).

पांढरी माशी व पिवळा मोझॅक दिसल्यास बाधित झाडे उपटून नष्ट करा, चिकट सापळे लावा.

शेंगा वाढीसाठी ००:५२:३४ (१०० ग्रॅम / १० लिटर पाणी) फवारावे.

खरीप ज्वारी

शेतात पाणी साचू देऊ नका.

लष्करी अळी दिसल्यास शिफारस केलेल्या कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी करा.

ऊस

पाण्याचा निचरा नीट व्हावा.

पांढरी माशी, पाकोळी दिसल्यास जैविक कीटकनाशक (लिकॅनीसिलियम लिकॅनी) किंवा शिफारस केलेली रासायनिक फवारणी करा.

रोगप्रादुर्भाव (पोक्का बोइंग, लाल कुज) दिसल्यास योग्य बुरशीनाशक वापरा.

हळद

उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्या.

करपा/ठिपके दिसल्यास कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करा.

कंदमाशी व हूमणीच्या अळ्यांवर शिफारस केलेल्या औषधांचा वापर करा.

फळबाग व्यवस्थापन

संत्रा/मोसंबी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. फळगळ टाळण्यासाठी झिंकची फवारणी करा.

डाळींबात अतिरिक्त फुटवे काढा. तेल्या रोग दिसल्यास बोर्डो मिश्रण किंवा कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करा.

चिकू : शेतात पाणी साचू देऊ नका.

भाजीपाला

काढणीस तयार पिके वेळेवर काढा.

शेंडा पोखरणारी अळी दिसल्यास कामगंध सापळे लावा किंवा योग्य कीटकनाशक फवारणी करा.

फुलशेती

काढणीस तयार फुले काढून घ्या.

शेतात पाणी साचू देऊ नका, तणनियंत्रण करा.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्कीन रोगाचा धोका वाढलेला आहे.

लसीकरण करून घ्या.

आजारी व निरोगी जनावरे वेगवेगळी ठेवा.

स्वच्छ पाणी व पोषक आहार द्या.

जखमांची काळजीपूर्वक देखभाल करा.

मुख्य सूचना

शेतात व घरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या.

पावसाच्या उघडीपनंतरच फवारण्या कराव्यात.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी 'या' उपाययोजनांचा अवलंब करा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनमराठवाडा