Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागली असली तरी यंदा तो वादळी वाऱ्यांसह येणार आहे. पुढील काही दिवसात नांदेड, लातूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि ताशी ३०–४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Krushi Salla)
यामुळे पिकांचे व जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.(Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Krushi Salla)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हवामानाशी सुसंगत पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन दिले आहे.(Krushi Salla)
वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
२० जुलै रोजी नांदेड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज.
२१ जुलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२२ जुलै रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील.
यात वाऱ्याचा वेग ३०–४० कि.मी. प्रति तास राहण्याचा अंदाज आहे.
तापमानाचा कल
आगामी चार ते पाच दिवसांत कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. विस्तारित अंदाजानुसार २४ जुलै पर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे किंवा अधिक, आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
पेरणी
जिथे अद्याप पेरणी झालेली नाही अशा ठिकाणी पाऊस (७५–१०० मिमी) झाल्यास सूर्यफूल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन+तूर, बाजरी+तूर, एरंडी, तिळ, एरंडी+धणे अशी पिके निवडावीत.
सोयाबीन
अंतरमशागत करून तण विरहीत ठेवावे.
अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवावीत.
पेरणीनंतर १ महिना झाल्यास पोटॅशियम नायट्रेटची (१३:००:४५) फवारणी करावी.
खरीप ज्वारी व बाजरी
तणनियंत्रण, आवश्यकतेनुसार पाणी व खतमात्रा पुरवावी.
उर्वरीत नत्र, स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी.
पेरणीस उशीर झाल्यास बाजरीची पेरणी ३० जुलैपर्यंत करता येते.
ऊस
पांढरी माशी व पाकोळी नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक फवारणी करावी.
पाण्याचा ताण टाळावा.
हळद
आंतरपिके म्हणून लवकर काढणी होणाऱ्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
नियमित नत्र व पाण्याचे व्यवस्थापन करावे.
फळबाग व्यवस्थापन
मृग व अंबे बहार संत्रा/मोसंबीमध्ये रसशोषक किडींवर नियंत्रण व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
डाळिंबात फुटवे काढून खत व फवारणी करावी.
चिकू, संत्रा, मोसंबी, डाळिंब लागवड करताना नोंदणीकृत रोपांची निवड करावी. भाजीपाला व फुलशेती
पाणी व तणनियंत्रण योग्य प्रकारे करावे.
उशिरा लागवड करायची असल्यास जमिनीत ओलावा पाहूनच करावी.
मिरची, वांगी, भेंडीमध्ये रसशोषक किडी नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी.
पशुधन
गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण व स्वच्छता ठेवावी.
वासरांना योग्य आहार व जंतनाशक उपचार द्यावेत.
आजारी व निरोगी जनावरांची विलग ठेव सुनिश्चित करावी.
रेशीम उद्योग
चीनप्रमाणे उत्पादन वाढवण्यासाठी तुतीच्या पानांचा दर्जा व संगोपन सुधारण्यावर भर द्यावा.
पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचे वातावरण राहील. त्यामुळे पिके व जनावरांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी बाळगावी. पाणी व खतांचे व्यवस्थापन वेळेवर करून पिकांची उत्पादकता टिकवावी.
(सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)