Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kanda Kadhani : कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही, खरीप कांदा काढणी समजून घ्या

Kanda Kadhani : कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही, खरीप कांदा काढणी समजून घ्या

Latest news Kharip Kanda Kadhani Kharif onion is harvested from October to December | Kanda Kadhani : कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही, खरीप कांदा काढणी समजून घ्या

Kanda Kadhani : कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही, खरीप कांदा काढणी समजून घ्या

Onion Harvesting : खरीप कांद्याची काढणी साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते, जी पीक लागवडीनंतर....

Onion Harvesting : खरीप कांद्याची काढणी साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते, जी पीक लागवडीनंतर....

शेअर :

Join us
Join usNext

Kharip Kanda Kadhani : खरीप कांद्याची काढणी साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते, जी पीक लागवडीनंतर सुमारे १०० ते ११० दिवसांनी काढणीस तयार होते. काढणीच्या वेळी नेमकी काय काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

खरीप कांदा काढणी 

  • खरिपाच्या कांदा पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी. 
  • खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही. 
  • अशावेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडाव्या लागतात. 
  • शेत कोरडे असताना पीक काढणी करावी. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन ते चार दिवस सुकण्यास पडू द्यावा. 
  • प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा की, दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. 
  • तीन ते चार दिवसांत कांद्याची पात पूर्णपणे सुकते. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेऊन कापावी. 
  • नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावे. 
  • राहिलेले चांगले कांदे गोळा करून सावलीत १० ते १२ दिवस ठेवावे. 
  • खरिपात काढणीच्या वेळी पावसाची शक्यता वाटत असल्यास पिकाची काढणी लवकर म्हणजे ९० ते १०० दिवसांनी सुद्धा करता येईल. 
  • मात्र असे कांदे ताबडतोब बाजारात विकावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : खरीफ प्याज की कटाई: अच्छे उपज के लिए समय और मुख्य सावधानियां

Web Summary : खरीफ प्याज की कटाई बुवाई के 100-110 दिन बाद करें। जरूरत पड़ने पर कृत्रिम रूप से गर्दन को झुकाएं। कटाई किए गए प्याज को 3-4 दिनों के लिए पत्तियों के साथ सुखाएं। पत्तियों को काटें, क्षतिग्रस्त प्याज को हटा दें और अच्छे प्याज को 10-12 दिनों के लिए छाया में रखें। बारिश की आशंका होने पर जल्दी कटाई करें और तुरंत बेच दें।

Web Title : Kharif Onion Harvesting: Timing and Key Precautions for a Good Yield

Web Summary : Harvest Kharif onions 100-110 days post-planting. Artificially induce neck fall if needed. Dry harvested onions with foliage for 3-4 days. Cut leaves, remove damaged onions, and store good onions in shade for 10-12 days. Harvest early if rain is expected and sell immediately.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.