Lokmat Agro >स्मार्ट शेती > Banana Fertilizer : केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर 

Banana Fertilizer : केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Kelichya Saliche Khat Don't throw away banana peels, make them into fertilizer | Banana Fertilizer : केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर 

Banana Fertilizer : केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर 

Banana Fertilizer : बऱ्याचदा केळीच्या साली (Kelichya Saliche Khat) हा कचऱ्यातच फेकल्या जातात. मात्र यापासून फायदेशीर खत बनवता येते.

Banana Fertilizer : बऱ्याचदा केळीच्या साली (Kelichya Saliche Khat) हा कचऱ्यातच फेकल्या जातात. मात्र यापासून फायदेशीर खत बनवता येते.

शेअर :

Join us
Join usNext

Banana Fertilizer : बऱ्याचदा केळीच्या साली (Kelichya Saliche Khat) हा कचऱ्यातच फेकल्या जातात. मात्र या केळीच्या सालीपासून फायदेशीर खत बनवता येऊ शकते. हेच खत परसबागेत (ParasBag) किंवा गार्डनमधील झाडांना फायदेशीर ठरू शकते. या खताचा वापर केल्याने झाडे नेहमीच हिरवीगार राहतील. केळीच्या सालींपासून खत कसे बनवावे, ते या भागातून समजून घेऊया... 

हे सेंद्रिय खत रसायनमुक्त आहे.
अनेकदा परसबागेत भाजीपाल्यासह (Vegetable Farming) फुलांची झाडे पाहायला मिळतात. शिवाय घराच्या बाल्कनीमध्ये विविध फुलांची झाडे लावली जातात. मात्र योग्य काळजी न घेतल्याने झाडांची वाढ होत नाही, काही झाडे जगत नाहीत. अशावेळी बाजारातून खते आणून कुंड्यांमध्ये टाकली जातात, पण या खतांमध्ये भरपूर रसायने असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही केळीच्या सालींपासून (Natural farming) नैसर्गिक खत बनवू शकता, जे झाडांना चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे प्रदान करते.

असे बनवा केळीच्या सालीपासून फायदेशीर खत

  • केळीच्या सालींव्यतिरिक्त, तुम्हाला एक छोटे कंटेनर आणि पाणी लागेल.
  • प्रथम केळीच्या साली बाजूला गोळा करा.
  • आता सालीचे पातळ तुकडे करा आणि बाजूला ठेवा.
  • नंतर एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवा आणि पाणी उकळले की त्यात साली घालून शिजवा.
  • सुमारे १५ ते २० मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा.
  • त्याचे पाणी काढून टाका आणि साली तीन-चार दिवस तसेच राहू द्या.
  • तुम्हाला हवे असल्यास, हे पाणी फेकून देण्याऐवजी, तुम्ही ते एखाद्या झाडातही ओतू शकता.
  • ३-४ दिवसांनी तुम्हाला दिसेल की खत पूर्णपणे तयार झाले आहे.
  • आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार कुंड्यांमधील रोपांसाठी ते वापरू शकता.

 

प्रचंड तापमानात झाडे थंड राहतात. 
जर तुमची झाडे नीट वाढत नसतील तर हे खत खूप उपयुक्त आहे. केळीच्या सालींमुळे पोषक तत्वे मिळतात. केळीच्या सालीचे पाणी जमिनीत ओलावा टिकवून ठेवते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात वनस्पतींना थंडावा मिळतो. रोपाच्या योग्य वाढीव्यतिरिक्त, त्यावर अधिकाधिक फुले देखील येतील. हे खत आठवड्यातून दोनदा वापरता येते. रोपाला जितके जास्त खत घालता येईल तितके ते चांगले.

Web Title: Latest News Kelichya Saliche Khat Don't throw away banana peels, make them into fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.