Lokmat Agro >स्मार्ट शेती > कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना

कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना

Latest News Kapus Lagvad Measures to be taken against reddening, stunted growth and sudden death of cotton crop | कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना

कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना

Cotton Farming : कापूस पिके लाल पडून वाढ खुंटलेली दिसत आहे. काही ठिकाणी आकस्मित मर (पॅराविल्ट) चे प्रमाण काही भागात दिसत आहे.

Cotton Farming : कापूस पिके लाल पडून वाढ खुंटलेली दिसत आहे. काही ठिकाणी आकस्मित मर (पॅराविल्ट) चे प्रमाण काही भागात दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Farming :  नाशिक जिल्हातील नांदगाव, मालेगाव, येवला भागातील परिसरामध्ये कापूस पिके हि लाल पडून वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. सोबत काही ठिकाणी आकस्मित मर (पॅराविल्ट) चे प्रमाण काही भागात दिसत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवानी खालील उपाययोजना कराव्यात. 

शेतकरी बांधवानी लवकरात लवकर खतमात्र द्यावी.

  • १३:००:४५ किंवा १९:१९:१९ चे ५ ग्रम/लिटर किंवा नॅनो युरीयाची ४ मिली/लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी
  • मॅग्नेशियम ची कमतरता दूर करण्यासाठी १ टक्का मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी करावी.
  • आकस्मित मर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसल्यास दीड किलो युरिया + दीड किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. 
  • त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ किलों डी ए पि १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ५० ते १०० मिली झाडाजवळ द्यावे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम + युरिया १० ग्रॅम प्रती लिटर हे प्रमाण घेऊन फवारणी करावी. 

 

नाशिक जिल्ह्यासाठी हवामान सल्ला 

कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज (IBF) आणि चेतावणी लक्षात घेता दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी (येलो अलर्ट) नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. 

दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी (येलो अलर्ट) नाशिक जिल्ह्यामध्ये एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे तसेच घाट क्षेत्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये (येलो अलर्ट) एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे, 

तसेच घाट क्षेत्रातील एक दोन ठिकाणी (ऑरेंज अलर्ट) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. ०५ सप्टेंबर २०२५ रोजी (येलो अलर्ट) नाशिक जिल्ह्यामध्ये एक-दोन ठिकाणी तसेच घाट क्षेत्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


- कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव  , ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Kapus Lagvad Measures to be taken against reddening, stunted growth and sudden death of cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.