Join us

Onion Black Rot : कांदा पिकावर काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव, असा करा बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:45 IST

Onion Black Rot : या रोगामुळे पाने करपतात, कांदा पीक कमकुवत होते, त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होते. 

Onion Black Rot : काळा करपा (Onion Black Rot), जो एक बुरशीजन्य रोग आहे, कांद्यावरील पानांवर आणि खोडांवर काळे डाग तयार करतो. या रोगामुळे पाने करपतात, कांदा पीक कमकुवत होते, त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होते. 

काळा करपा रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांची योग्य काळजी घेणे, प्रमाणित बियाणे वापरणे आणि आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, हे समजून घेऊयात.... 

काळा करपा (पीळ)

  • सतत तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 
  • तो टाळण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत असल्याची खात्री करावी. 
  • या रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेडाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पानांवर फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, मँकोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.

(नाशिक जिल्ह्यात ह्यात जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता वरील सर्व कामे प्रसारित केलेल्या दिवसाकरिता स्थगित कराव्यात किंवा पुढील चार दिवस पुढे ढकलावीत.)

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :कांदामार्केट यार्डपीक व्यवस्थापनशेती