Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? पैसे किती लागतात? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? पैसे किती लागतात? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Jamin Mojani application How to apply for land Measurement application fee Know in detail  | Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? पैसे किती लागतात? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? पैसे किती लागतात? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी (Land Measurement Application) अर्ज कसा करायचा, काय कागदपत्र लागतात आणि शुल्क किती लागतं हे यातून पाहणार आहोत. 

Jamin Mojani : जमीन मोजणीसाठी (Land Measurement Application) अर्ज कसा करायचा, काय कागदपत्र लागतात आणि शुल्क किती लागतं हे यातून पाहणार आहोत. 

Jamin Mojani : आजच्या घडीला जमीन (Land) हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. न्यायालयात रोजच जमीनीबाबतची नवनवी प्रकरणे पाहायला मिळतात. जमिनीच्या छोट्या छोट्या हिस्स्यावरून वाद झाल्याचे काही नवीन नाही. अशावेळी काही शेतकरी जमीन मोजणीला (Land Measurement Application) प्राधान्य देतात. त्यामुळे जमीन कुठपासून कुठपर्यंत हे मोजणीच्या आधारे कळते. याच अनुषंगाने जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, काय कागदपत्र लागतात आणि शुल्क किती लागतं हे यातून पाहणार आहोत. 

अर्ज कसा भरायचा, ते पाहुयात... 

  • सर्वप्रथम अर्जाचा सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. 
  • यावर मोजणीसाठी अर्ज असं ठळक अक्षरात लिहिलेलं आहे. 
  • यानंतर आपला तालुका, जिल्हा नमूद करावा. 
  • खालील रकान्यात आपले संपूर्ण नाव, गाव, पिनकोडसहित मोबाईल क्रमांक टाकावा. 
  • त्यानंतर खालील रकान्यात मोजणी करण्यासंबंधीची माहिती, मोजणीचा प्रकार, गाव, वार्ड आणि शेतीचा गट नंबर नमूद करणे आवश्यक असते. 
  • त्यानंतर मोजणी फीची रक्कम नमूद करावी, चलन पावती क्रमांक टाकावा. 
  • तसेच ७/१२ उताऱ्याप्रमाणे सहधारकांची नावे टाकावीत. 
  • त्यानंतर लगतचे कब्जेदार, त्यांचे नाव, पत्ते टाकावेत. जसे की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.. 
  • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे तपशील द्यावेत... जसे की अर्ज, मोजणी फी चलन, ३ महाचे मिळकत पत्रिका, ३ महाचे आतील ७/१२ 
  • अर्जाच्या शेवटी अर्जदाराचा सही किंवा अंगठा द्यावा... 

 

शेत मोजणीसाठी तुम्ही आपल्या स्थानिक तहसीलदार किंवा तालुका कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. तसेच या अर्जाचा नमुना सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. किंवा थेट इथूनही डाउनलोड करू शकता.

 

हेही वाचा : Jamin Mojani : जमीन मोजणी कशी करतात, साधी मोजणी किती दिवसांत होते? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Jamin Mojani application How to apply for land Measurement application fee Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.