Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Index 2 : इंडेक्स 2 म्हणजे काय, मालमत्तेसाठी इंडेक्स 2 कसा मिळवायचा, यात आणि सातबारात फरक काय? 

Index 2 : इंडेक्स 2 म्हणजे काय, मालमत्तेसाठी इंडेक्स 2 कसा मिळवायचा, यात आणि सातबारात फरक काय? 

Latest News Jamin Kharedi What is Index 2, how to get इंडेक्स 2 for property, difference between satbara or index 2 | Index 2 : इंडेक्स 2 म्हणजे काय, मालमत्तेसाठी इंडेक्स 2 कसा मिळवायचा, यात आणि सातबारात फरक काय? 

Index 2 : इंडेक्स 2 म्हणजे काय, मालमत्तेसाठी इंडेक्स 2 कसा मिळवायचा, यात आणि सातबारात फरक काय? 

Land Index 2 : अनेकदा लोकांच्या तोंडून जमिनीच्या संदर्भातील इंडेक्स २ चा उल्लेख होतो, मग सातबारा आणि इंडेक्स २ सारखेच का?

Land Index 2 : अनेकदा लोकांच्या तोंडून जमिनीच्या संदर्भातील इंडेक्स २ चा उल्लेख होतो, मग सातबारा आणि इंडेक्स २ सारखेच का?

Land Index 2 : नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलम ५५ नुसार, इंडेक्स II (सूची II) किंवा इंडेक्स २ हे एक कायदेशीर प्रमाणपत्र आहे. ज्यामध्ये नोंदीसाठी दुय्यम निबंधकाचे कार्यालय येथे सबमिट केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह मालमत्ता नोंदणीचे सर्व तपशील नमूद केले आहे.

Index -२ म्हणजे : नोंदणी झालेल्या मालमत्ता व्यवहाराचा (Sale Deed / Agreement/Gift / Mortgage) अधिकृत सारांश उतारा, जो नोंदणी कार्यालयाकडून (Sub-Registrar Office) दिला जातो. थोडक्यात जमीन / फ्लॅटची नोंदणी (Registry) झाल्याचा सरकारी पुरावा म्हणजे इंडेक्स - २ होय. 

Index - २ मध्ये कोणती माहिती असते? 
तर इंडेक्समध्ये खरेदीदाराचे नाव, विक्रेत्याचे नाव, मालमत्तेचा पत्ता, CTS / Survey / Gat नंबर, जमिनीचे क्षेत्रफळ, व्यवहाराचा प्रकार (Sale / Gift / Mortgage इ.), व्यवहाराची तारीख, नोंदणी क्रमांक, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी इत्यादी. 

इंडेक्स - २ का महत्वाचा आहे?
तर इंडेक्स २ हा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी, बँक लोनसाठी, पुढील विक्री करताना. कोर्ट केस / वादात पुरावा म्हणून, प्रॉपर्टी कार्ड, सातबारा अपडेटसाठी महत्वाचा आहे. 

इंडेक्स बद्दल अजून काही.... 

इंडेक्स २ म्हणजेच मालकीचा एकमेव पुरावा नाही. शिवाय इंडेक्स २ मध्ये चूक असेल तर कर्ज काढण्यास अडचणी. जर यामध्ये चुका झाल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागतो.

इंडेक्स २ हा नोंदणी झाल्याचा पुरावा आहे. पण मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सातबारा महत्वाचा ठरतो.  इंडेक्स २ हरवला तर काय? तर पुन्हा दुय्य्म निबंधक कार्यालयात जाऊन डुप्लिकेट इंडेक्स मिळतो. 

 

Read More : खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर

Web Title : इंडेक्स 2: अर्थ, कैसे प्राप्त करें, और 7/12 उद्धरण से अंतर

Web Summary : इंडेक्स 2 एक कानूनी दस्तावेज है जो संपत्ति पंजीकरण का विवरण देता है। यह स्वामित्व साबित करने, ऋण आवेदनों और विवादों को सुलझाने के लिए महत्वपूर्ण है। जबकि इंडेक्स 2 पंजीकरण साबित करता है, 7/12 उद्धरण स्वामित्व अधिकार स्थापित करने के लिए आवश्यक है। डुप्लिकेट प्रतियां उप-पंजीयक कार्यालय में उपलब्ध हैं।

Web Title : Index 2: Meaning, how to obtain, and difference from 7/12 extract

Web Summary : Index 2 is a legal document detailing property registration. It's crucial for proving ownership, loan applications, and resolving disputes. While Index 2 proves registration, the 7/12 extract is essential for establishing ownership rights. Duplicate copies are available at the Sub-Registrar office.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.