Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर 

खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Jamin Kharedi difference between in kharedi khat or satbara utara, know in detail | खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर 

खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर 

Kharedi Khat : जुना मालक म्हणतो उताऱ्यावर नाव माझे आहे. मीच मालक आहे, असे म्हणून हरकत करतो तर त्या जमिनीचा खरा मालक कोण?

Kharedi Khat : जुना मालक म्हणतो उताऱ्यावर नाव माझे आहे. मीच मालक आहे, असे म्हणून हरकत करतो तर त्या जमिनीचा खरा मालक कोण?

Kharedi Khat : जमिनीचे नोंदणीकृत खरेदीखत झाले, परंतु उताऱ्यावर नोंद केली नाही. जुना मालक म्हणतो उताऱ्यावर नाव माझे आहे. मीच मालक आहे, असे म्हणून हरकत करतो तर त्या जमिनीचा खरा मालक कोण? आजच्या भागातून खरेदीखत महत्वाचे की सातबारा हे समजून घेऊयात...

खरेदीखत आणि सातबारा यातील फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात..
एक शेत जमीन किंवा मिळकत असते. या जमिनीचा 'ए' हा मालक असतो. यानंतर 'ए' हा 'बी' ला त्या जमिनीचे नोंदणीकृत खरेदीखत करून देतो नोंदणीकृत खरेदीखत करून दिल्यानंतर 'बी' कडून त्या जमिनीवर त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे उताऱ्यावर नोंद लावायची राहून जाते. 

या दरम्यान ए हा बी ला सदर जमीन ही माझी असून जमिनीच्या उताऱ्यावर माझे नाव आहे. त्यामुळे सदर जमीन तू करायची नाही, जमिनीत यायचं नाही, असे सांगून जमिनीचा मालक अजूनही मीच असल्याचे सांगतो. 

सुरुवातीला ए ने बी ला नोंदणीकृत खरेदी खत करून दिले. तेव्हापासून ए हा सदर जमिनीचा मिळकतीचा मालक राहत नाही हे स्पष्ट होते. म्हणजेच त्या मूळ मालकाचा सदर जमिनीवर कोणताही हक्क व अधिकार राहत नाही.

जर तो ए सदर जमिनीच्या वही वाटीत हरकत किंवा अडथळा आणत असेल तर बी याला न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे अधिकार आहेत. कारण त्याने केलेले खरेदी खरेदी खत फक्त उताऱ्यावर नोंद केली नाही म्हणून तो त्या जमिनीचा मालक होत नाही असे होणार नाही, कारण जे झालेलं खरेदी खत आहे ते रजिस्टर खरेदी खत आहे आणि रजिस्टर खरेदी खताने तो मालक आहे. 

ए हा फक्त नामधारी मालक राहिलेला असून जमिनीचे सातबारे उतारे हे मालकीचे प्रूफ नसून जमिनीचे सातबारा उतारे हे फक्त कर गोळा करण्यासाठीचा कागद आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देखील दिला आहे. 

त्यामुळे एखाद्या जमिनीचे जर खरेदी खत झाले असेल आणि उताऱ्यावर नाव लावायचे राहून गेले असेल तर अशावेळी संबंधित पूर्वीचा जमीन मालक अडथळा आणत असेल तर तर कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊन त्याने हरकत अडथळा करू नये, अशा मनाईचा दावा त्याच्याविरुद्ध दाखल करू शकतो.

 

Read More : शेतातील सोलर पॅनलची सफाई करताना 'या' गोष्टी चुकूनही करू नका, वाचा सविस्तर

Web Title: Latest News Jamin Kharedi difference between in kharedi khat or satbara utara, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.