Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जमीन गहाण ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जमीन हातातून गेली म्हणून समजा!

जमीन गहाण ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जमीन हातातून गेली म्हणून समजा!

Latest News Jamin Gahan Keep these things in mind when mortgaging land for loan, otherwise land lost! | जमीन गहाण ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जमीन हातातून गेली म्हणून समजा!

जमीन गहाण ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जमीन हातातून गेली म्हणून समजा!

Land Mortgage :  शेतीसाठी किंवा कोणतेही लोन घेताना जमीन गहाण ठेवताना खालील महत्वाच्या गोष्टींची दक्षता घ्यावी

Land Mortgage :  शेतीसाठी किंवा कोणतेही लोन घेताना जमीन गहाण ठेवताना खालील महत्वाच्या गोष्टींची दक्षता घ्यावी

Land Mortgage :    शेतीसाठी किंवा कोणतेही लोन घेताना जमीन गहाण ठेवताना खालील महत्वाच्या गोष्टींची दक्षता घ्यावी, अन्यथा भविष्यात मालमत्तेवर संकट येऊ शकते. फक्त गरज असल्यासच लोन घ्या. कर्जाचा वापर कुठे आणि किती करणार हे स्पष्ट असावे. व्याजदर, परतफेडीची मुदत आणि एकूण रक्कम स्पष्ट समजून घ्या.

कर्ज कोणत्या प्रकारचे आहे ते समजून घ्या
शेती कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, व्यवसाय कर्ज - प्रत्येक प्रकारचे नियम वेगळे असतात. शेतीसाठी कर्ज घेत असल्यास बँकेच्या कृषी विभागातून माहिती घ्या.

जमीन गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर अटी
जमीन तुमच्या नावावर असावी कोणताही तंटा नसलेली व वादमुक्त जमीन असावी.
संमती संयुक्त जमीन असल्यास सर्व मालकांची संमती आवश्यक
कोणतेही बंधन नसावे उदाहरण : कुळकायद्यानुसार कुळाने अडथळा आणू शकतो.

  • गहाण ठेवताना मूळ दस्तऐवज बँकेकडे जातात.
  • मूळ सातबारा, आठ अ, आणि जमिनीच्या इतर कागदपत्रांची प्रत बँक ठेऊन घेते.
  • याची रीतसर रिसीट घ्यावी.
  • बँकेसोबत गहाणनामा तपासून करावा.
  • हे दस्तऐवज नोंदणी कार्यालयात मध्ये नोंदवलेले असतात.
  • याची प्रत घ्या व नीट वाचून घ्या, यातील कोणते हक्क बँकेला दिले आहेत हे स्पष्ट असावे.
  • EMI बाबतची माहिती सविस्तर घ्या.
  • हप्ते वेळेवर भरणे अत्यावश्यक अन्यथा बँक जमीन विक्रीचा अधिकार वापरू शकते.
  • उशीर झाल्यास दंड, व्याज वाढ लागू शकते.
  • कर्ज फिटवल्यावर गहाण मुक्ती अनिवार्य
  • सर्व रक्कम परत केल्यानंतर बँकेकडून 'गहाण मुक्ती प्रमाणपत्र' घ्या.
  • आणि महत्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्यावरून 'गहाण' नोंद हटवा.

 

कर्ज न फेडल्यास काय होऊ शकते?
बँक तुम्हाला कर्ज थकबाकीदार घोषित करू शकते.
कायद्यानुसार जमिनीचा लिलाव होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात किंवा बँकेत जाऊन भेट द्या. 

Web Title : भूमि बंधक: अपनी संपत्ति की सुरक्षा के लिए याद रखने योग्य बातें

Web Summary : भूमि बंधक रखते समय, ऋण की शर्तों, ब्याज और पुनर्भुगतान को समझें। स्पष्ट भूमि स्वामित्व सुनिश्चित करें और आवश्यक सहमति प्राप्त करें। जमा किए गए दस्तावेजों के लिए रसीदें सुरक्षित करें, बंधक विलेखों की सावधानीपूर्वक समीक्षा करें और समय पर ईएमआई भुगतान को प्राथमिकता दें। पूर्ण पुनर्भुगतान के बाद 'बंधक मुक्ति प्रमाण पत्र' प्राप्त करें और भूमि अभिलेखों से 'बंधक' प्रविष्टि हटा दें। चुकाने में विफलता से भूमि की नीलामी हो सकती है।

Web Title : Land Mortgage: Key Things to Remember to Protect Your Property

Web Summary : When mortgaging land, understand loan terms, interest, and repayment. Ensure clear land ownership and obtain necessary consents. Secure receipts for documents submitted, review mortgage deeds carefully, and prioritize timely EMI payments. Obtain a 'mortgage release certificate' after full repayment and remove the 'mortgage' entry from land records. Failure to repay can lead to land auction.