Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bakshish Patra : शेत जमिनीचे बक्षिसपत्र रद्द करता येते का? नेमकी कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्या!

Bakshish Patra : शेत जमिनीचे बक्षिसपत्र रद्द करता येते का? नेमकी कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्या!

Latest News jamin Bakshish patra Can farm land gift deed be cancelled Know the exact legal process | Bakshish Patra : शेत जमिनीचे बक्षिसपत्र रद्द करता येते का? नेमकी कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्या!

Bakshish Patra : शेत जमिनीचे बक्षिसपत्र रद्द करता येते का? नेमकी कायदेशीर प्रक्रिया जाणून घ्या!

Jamin Bakshish Patra : बक्षीसपत्र म्हणजे मालमत्ता विनामूल्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणारा कायदेशीर दस्तऐवज आहे.

Jamin Bakshish Patra : बक्षीसपत्र म्हणजे मालमत्ता विनामूल्य एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणारा कायदेशीर दस्तऐवज आहे.

Jamin Bakshish Patra  : बक्षीसपत्र (Gift Deed) म्हणजे मालमत्ता विनामूल्य (कोणत्याही मोबदल्याशिवाय) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणारा कायदेशीर दस्तऐवज आहे. ज्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरावे लागते व ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. 

मग हे बक्षिसपत्र रद्द करता येते का? तर एकदा स्वीकारल्यावर हे पत्र सहसा रद्द करता येत नाही, पण काही विशेष परिस्थितीत ते रद्द होऊ शकते. याबाबत काही शक्यता समजून घेऊयात... 

जर बक्षीसपात्र करताना फसवणुकीने, बळजबरीने झाले असेल तर किंवा इतर अन्य कारणांनी दबाव टाकून जर केले असेल तर ते बक्षिसपत्र रद्द करता येऊ शकते. यासाठी दिवाणी न्यायालायात दाद मागता येते. 

सदर बक्षीसपत्राविरुद्ध कारवाई करून ते बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकता. जर दान करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हयातीमध्ये बक्षिसपत्र तयार केले असल्यास ते ग्राह्य धरले जाते. जर त्याच्या मृत्यू पश्चात ते बक्षिसपत्र रद्द करायचं झालं तर ते होऊ शकत नाही. 

तोंडी बक्षिसपत्र चालते का? 
तोंडी बक्षिसपत्र ग्राह्य धरलं जात नाही. कारण त्याला कुठलाही बेस नसतो. बक्षिसपत्र हे लेखी स्वरूपातच नोंदणीकृत करावे लागते. तुमच्या जवळच्या रजिस्टर कार्यालयात जाऊन रीतसर स्टॅम्प ड्युटीसह प्रोसेस फी भरून रजिस्टर करून घ्यावं लागत. तो दस्त नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर कार्यालयाकडून परत दिला जातो. तो मूळ दस्त तुमच्याकडे असणं आवश्यक असते. 

Web Title: Latest News jamin Bakshish patra Can farm land gift deed be cancelled Know the exact legal process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.