Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जमिनीचे तोंडी वाटप कायदेशीर असते का, नवीन वारस हिस्सा मागू शकतात का? वाचा सविस्तर 

जमिनीचे तोंडी वाटप कायदेशीर असते का, नवीन वारस हिस्सा मागू शकतात का? वाचा सविस्तर 

Latest news Is oral distribution of land legal, can new heirs claim share Read in detail | जमिनीचे तोंडी वाटप कायदेशीर असते का, नवीन वारस हिस्सा मागू शकतात का? वाचा सविस्तर 

जमिनीचे तोंडी वाटप कायदेशीर असते का, नवीन वारस हिस्सा मागू शकतात का? वाचा सविस्तर 

Jamin Tondi Vatap : जमिनीचे तोंडी वाटप कायद्याने मान्य असले तरी, ते सिद्ध करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात.

Jamin Tondi Vatap : जमिनीचे तोंडी वाटप कायद्याने मान्य असले तरी, ते सिद्ध करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात.

Jamin Tondi Vatap :   तुमची वडिलोपार्जित जमीन होती, ती तुमच्या आजोबा किंवा पंजोबानी अनेक वर्षांपूर्वी तोंडी वाटप केले होते. म्हणजेच जमिनीचे हिस्से करून ज्याला त्याला वाटून दिले.

त्यांनतर अनेक वर्षांपासून तुम्ही जमीन कसत आहात किंवा जमिनीचा वापर करत आहात, तर आता तुमची नवीन येणारी पिढी असेल, किंवा वारस असतील, ते त्या वडिलोपार्जित जमिनीतून हिस्सा मागू शकत नाही. याला कारण काय आहे, पुढे जाऊन काय करावे, हे पाहुयात... 

जमिनीचे तोंडी वाटप कायद्याने मान्य असले तरी, ते सिद्ध करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. अनेक वर्षे जमिनीचा ताबा, लागवड आणि त्याद्वारे होणारा महसूल (७/१२ उतारा) यावरून तोंडी वाटणी सिद्ध करता येते. भविष्यातील वाद टाळण्यासाठी, तोंडी वाटणीनंतर त्वरित रीतसर 'वाटप पत्र' करून नोंदणी करणे आणि महसूल दप्तरी फेरफार करणे कायदेशीररित्या उत्तम ठरते. 

तोंडी वाटपाबाबत महत्त्वाचे मुद्दे : 
कायदेशीर मान्यता :
तोंडी वाटप सिद्ध झाल्यास ते रद्द करता येत नाही, परंतु योग्य पुरावे असणे गरजेचे आहे. 
पुरावे : जर जमिनीची वाटेकरी आपापसात वाटणी करून ती अनेक वर्षे कसत असतील, तर तो तोंडी वाटणीचा मोठा पुरावा मानला जातो. 
नोंदणी (Registration) : तोंडी वाटप लेखी स्वरूपात नसेल तर भविष्यात वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे ते नोंदणीकृत करणे केव्हाही योग्य. 
नोंद कशी करावी : तोंडी वाटपानंतर सातबारा उताऱ्यावर नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात वारसा हक्काचा किंवा वाटणीचा फेरफार अर्ज सर्व सहमतीने सादर करावा. 
वाद निर्माण झाल्यास : जर एखाद्या वारसाने तोंडी वाटणी नाकारली, तर दिवाणी न्यायालयात (Civil Court) वाटप दरखास्त दाखल करून कायदेशीर हिस्सा मिळवता येतो. 

थोडक्यात, तोंडी वाटप कायदेशीर आहे, पण ते कागदोपत्री (Record) असले तर पुढे जाऊन वाद टळतात.

 

हेही वाचा - जमीन मालकीचा पुरावा नाही, 12 वर्ष जमिनीवर ताबा आहे, मालकी सांगता येते का, काय सांगतो कायदा?

 

Web Title: Latest news Is oral distribution of land legal, can new heirs claim share Read in detail