Dalimb Bag : डाळिंब बागेचे व्यवस्थापन (Pomegranate Farm) म्हणजे डाळिंबाच्या झाडांची योग्य काळजी घेणे, ज्यामुळे ते निरोगी राहतील आणि चांगले उत्पादन देतील. यामध्ये योग्य खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण, तसेच झाडांची छाटणी करणे यांचा समावेश होतो.
डाळिंब बागेचे व्यवस्थापन
- कोवळी फूट अधिक असेल तर कोवळे शेंडे खुडावे.
- फळधारक फांद्यांना आणि झाडांना बांधून आधार द्यावा.
मृग बहार / अर्ली मृग बहार (जून-जुलै फूलधारणा)
बागेची सध्याची अवस्था विश्रांती / ताण अवस्था
- ताणावर असलेल्या झाडांना फळ तोडणी संपल्यावर आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्य छाटणी झाल्यानंतर खतांची मात्रा दिलेली असेल. ही मात्रा लागू होण्यासाठी हलके पाणी द्यावे.
- बहार धरण्यापूर्वी १-२ महिने (जमिनीच्या प्रकारानुसार) पाणी बंद ठेवावे.
- प्रत्येक १५ दिवसानंतर बोर्डो मिश्रण (१ टक्के) या प्रमाणे फवारणी घ्यावी.
- फळ तोडणीनंतर झाडाच्या खोडाना गेरू किंवा लाल मातीची पेस्ट तयार करून जमिनीपासून दीड ते दोन फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरित्या लावावी.
- पेस्टसाठी प्रमाण- गेरू लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २० मिली अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम अधिक १० लीटर पाणी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी