Dalimb Crop Management : डाळिंब पिकाच्या बाबतील फेब्रुवारी महिन्यात (अंबिया बहार) पिक नियमन करणे महत्वाचे आहे. सध्या डाळिंब पीक नवीन पालवी फुटण्याची अवस्थेत असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागते.
डाळिंब - आंबिया बहार (फेब्रुवारी पिक नियमन)
कीड व्यवस्थापन
नवीन पालवी फुटण्याची अवस्था
पहिले पाणी दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निळे किंवा पिवळे चिकट सापळे २५ ते ३० सापळे प्रती एकर याप्रमाणे झाडाच्या सर्वात उंच फांदीपासून १० ते १५ सें.मी. खाली बांधवे. हे सापळे चिकटलेल्या किडीनुसार २० ते २५ दिवसांनी बदलावेत.
वाढीची अवस्था
ॲझाडिरॅक्टिन / कडुनिंब तेल १% (१० हजार पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मिली किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने एक-दोन फवारण्या घ्याव्यात.
फुलधारणा / फुलकळी येण्याची अवस्था
७ ते १० दिवसांच्या अंतराने सायअँट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) ०.९ मिली किंवा क्लोर अँट्रानिलीप्रोल (१८.५ थायक्लोप्रिड (४८० एससी) ०.५ मिली अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ एससी) ०.३ मिली किंवा फ्लुबेन्डीॲमाइड मिली लिटर पाणी याप्रमाणे एक-दोन फवारण्या घ्याव्यात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
