Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > असे करा डाळिंब बागेवरील कीड-रोग व्यवस्थापन, एकही फळ वाया जाणार नाही!

असे करा डाळिंब बागेवरील कीड-रोग व्यवस्थापन, एकही फळ वाया जाणार नाही!

Latest News how to manage pests and diseases in pomegranate orchards, see details | असे करा डाळिंब बागेवरील कीड-रोग व्यवस्थापन, एकही फळ वाया जाणार नाही!

असे करा डाळिंब बागेवरील कीड-रोग व्यवस्थापन, एकही फळ वाया जाणार नाही!

Pomegranate Management : डाळिंब कीड-रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे, तसेच..

Pomegranate Management : डाळिंब कीड-रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे, तसेच..

Pomegranate Management : डाळिंब कीड-रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे, ज्यात स्वच्छता, जैविक उपाय आणि गरजेनुसार रासायनिक उपाय करणे गरजेचे असते. 

मृग बहार (बागेची अवस्था विश्रांती)
किड व्यवस्थापन

  • विश्रांती काळामध्ये बागेची नियमित पाहणी करावी. बागेमध्ये खोडकिडा, पिन होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास गरजेनुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने योग्य फवारणी करावी.
  • वर सुचविल्याप्रमाणे व्यवस्थापन हे किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यावरच करावे.
  • विश्रांती काळामध्ये झाडांना खालीलप्रकारे पेस्ट बनवून लावावी.
  • लाल माती ४ किलो + क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २० मि.ली. + कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा १०% बोर्डो पेस्ट क्लोरोपायरीफॉस (२० ईसी) २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे वापरुन तयार केलेली पेस्ट झाडाच्या खोडाला जमिनीपासून २-२.५ फुटांपर्यंत लावावी.
  • रसायनांच्या वापरासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने प्रकाशित केलेल्या ॲड-हॉक लिस्टचा वापर केला जाऊ शकतो.

रोग व्यवस्थापन

  • विश्रांतीच्या काळात १० ते १५ दिवसांच्या अंतराने खालील फवारण्या हवामान आणि पीक समस्यांनुसार घ्याव्यात.
  • १% बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २-२.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साईड (५३.८ डब्ल्यूपीद) २ ग्रॅम किंवा ब्रोनोपॉल (९५%) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून वापरावीत.
  • बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यासय मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा इतर योग्य बुरशीनाशकाची एक फवारणी अॅग्रोकेमिकल्सच्या ॲड-हॉक सूचीमध्ये नमूद केलेल्या बुरशीनाशकांपैकी घेतली जाऊ शकते.
  • बोर्डो मिश्रण सोडून सर्व ओषधांमध्ये फवारणीवेळी चांगल्या प्रतीचे स्टिकर स्प्रेडर ०.२५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळावे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी 

Web Title : अनार के बाग में कीट व रोग प्रबंधन: कोई फल बर्बाद नहीं!

Web Summary : अनार के बागों के लिए एकीकृत कीट और रोग प्रबंधन महत्वपूर्ण है। सुप्तावस्था के दौरान नियमित निगरानी, जैविक नियंत्रण और आवश्यकता-आधारित रासायनिक उपचार आवश्यक हैं। स्वस्थ उपज के लिए मौसम और फसल की स्थिति के अनुसार तनों पर सुरक्षात्मक पेस्ट लगाएं और अनुशंसित कवकनाशी का उपयोग करें।

Web Title : Effective Pomegranate Orchard Pest & Disease Management: No Fruit Loss!

Web Summary : Integrated pest and disease management is crucial for pomegranate orchards. Regular monitoring, biological controls, and need-based chemical treatments during dormancy are vital. Apply protective paste to trunks and use recommended fungicides, adapting to weather and crop conditions for healthy yields.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.