Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bogus Satbara Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? 'या' तीन गोष्टी नक्की पहा!

Bogus Satbara Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? 'या' तीन गोष्टी नक्की पहा!

Latest News How to identify bogus Satbara Utara Check out these three things! | Bogus Satbara Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? 'या' तीन गोष्टी नक्की पहा!

Bogus Satbara Utara : बोगस सातबारा उतारा कसा ओळखायचा? 'या' तीन गोष्टी नक्की पहा!

Bogus Satbara Utara : तुमच्यासमोर सादर केलेला सातबारा उतारा (7/12) खरा आहे की खोटा ते कसे ओळखावे

Bogus Satbara Utara : तुमच्यासमोर सादर केलेला सातबारा उतारा (7/12) खरा आहे की खोटा ते कसे ओळखावे

शेअर :

Join us
Join usNext

Bogus Satbara Utara : बोगस सातबारा उतारा (Bogus Satbara Utara) वापरून जमीन खरेदी बँक कर्ज प्रकरण अनेकदा समोर आली आहेत. बोगस सातबारा जमीन खरेदीच्या प्रकरणात वापरण्यात आल्याने अनेकांना जेलची हवा सुद्धा खावी लागली आहे. तुम्ही सुद्धा जमीन खरेदी करत असाल आणि तुमच्यासमोर सादर केलेला सातबारा उतारा (7/12) खरा आहे की खोटा ते कसे ओळखावे हे आजच्या भागात आपण पाहूयात. 

तर सर्वात प्रथम सातबारा उताऱ्यावर (Satbara Utara) तलाठ्याची सही आहे किंवा नाही हे तपासावे. कारण कोणत्याही सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही ही असतेच त्यामुळे हा पहिला पर्याय 100 टक्के तपासून पहावा. 

आता अलीकडे शासनाच्या माध्यमातून डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे या सातबारावर कुठेही तलाठ्याची सही दिसून येत नाही मात्र या सातबारावर खाली एक सूचना देण्यात आलेली असते. त्यामध्ये गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजिटल असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही, अशी सूचना आपल्याला दिसून येते. 

आता जमीन खरेदीच्या वेळी डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताराची प्रिंट घेऊन तुमच्याकडे आले तर त्यावर खालच्या बाजूस ही सूचना नसेल तर तो सातबारा उतारा 100 टक्के बनावट असल्याचे गृहीत धरावे. 

सातबारा बोगस आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे त्यावरील क्यू आर कोड. शासनाने नव्याने जो डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. त्यावर हा क्यूआर कोड आपल्याला दिसून येतो. हा किंवा कोड स्कॅन केल्यास आपल्याला संबंधित जमिनीच्या मालकाबाबत माहिती मिळते. त्यामुळे जर डिजिटल सातबारावर हा क्यू आर कोड नसेल तर तो सातबारा बनावट असू शकतो. 

त्यानंतर बोगस सातबारा ओळखण्याची आणखी एक खूण म्हणजे एल जी डी कोड आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो होय. प्रत्येक नवीन डिजिटल सातबारा उताऱ्यावर कोड आपल्याला पाहायला मिळतो. सातबाराच्या सुरुवातीलाच एलजीडी कोड म्हणजेच लोकल गव्हर्मेंट दिरेक्टरी कोड हा आपल्याला पाहायला मिळतो. हा विशिष्ट ओळख क्रमांक असून तो गावाच्या नावासमोर अधोरेखित केलेला असतो.

शिवाय सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि महाभुमीचा लोगो आपल्याला तपासून घ्यायचा आहे. महाराष्ट्र शासन लोगो हा सर्वात वरच्या बाजूला असतो तर तर महाभूमीचा लोगो हा सातबाराच्या ठीक मध्यभागी असतो. वरील दोन्ही गोष्टी अगदी सोपे असून या तुम्हाला सहजच सातबारा उताऱ्यावर पाहता येतील. 

अशा पद्धतीने वरील तीन गोष्टी या सातबारावर आपल्याला तपासून घ्यावयाच्या आहेत. जेणेकरून आपली जमीन खरेदीतील फसवणूक टाळता येईल.

Web Title: Latest News How to identify bogus Satbara Utara Check out these three things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.