Bhogwatdar Class Land : जमिनीचे रुपांतर म्हणजे एका उपयोगाची (उदा. शेती) जमीन दुसऱ्या उपयोगासाठी (उदा. निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक) बदलणे. म्हणजेच भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे करायचे, हे पाहुयात....
अर्जाची प्रक्रिया
आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा प्रांत कार्यालयात अर्ज सादर करा.
अर्जामध्ये जमिनीचा सर्वे नंबर आणि गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे (शेती, घर बांधकाम, इ.) अशी अचूक माहिती द्या.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्जदाराचा ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानकार्ड)
सातबारा उतारा आणि आठ अ उतारा
फेरफार उतारा, मिळकत दाखला, जमीन वर्ग दोनची मंजुरी आदेशाची प्रत
जमीन वापर प्रमाणपत्र
नागरी सुविधा असल्याचे प्रमाणपत्र (गावठाण हद्दीबाहेर असल्यास आवश्यकता नाही, असल्यास जमीन मोजणी नकाशा आवश्यक)
सोबत चलनाची प्रत अर्जासोबत जोडा.
अर्ज सादर करताना अटींची पूर्तता
जमीन शासकीय जमीन असल्यास ती शासन आदेशानुसार वर्ग एकमध्ये रूपांतर करता येते.
जमीन कोणत्याही न्यायालयीन वादात नसावी.
शासकीय रेकॉर्डनुसार जमीन मालकाच्या नावावर असावी.
जमीन महसूल थकबाकी नसावी.
स्थानिक प्राधिकरणाच्या (ग्रामपंचायत किंवा महापालिका)
चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणी
यानंतर तहसीलदार किंवा तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करतील.
चौकशीनंतर अहवाल तयार केला जाईल.
अहवालानुसार अर्जास मंजुरी किंवा नकार दिला जाईल.
मंजुरी आदेश आणि नोंदणी
मंजुरी मिळाल्यानंतर जमीन वर्ग ०२ वरून वर्ग एकमध्ये रूपांतरित होईल.
ही नोंद सातबारा उताऱ्यात केली जाईल.
मंजुरीनंतर तुम्ही त्या जमिनीला विक्री, हस्तांतरण किंवा इतर कायदेशीर व्यवहार करू शकता.
वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतर करण्याचे फायदे
जमिनीवर संपूर्ण मालकी हक्क मिळतो.
जमिनीचे विक्री व्यवहार किंवा हस्तांतरणासाठी कोणतीही अडचण येत नाही.
बँकेत गहाण ठेऊन कर्ज घेणे शक्य होते.
जमिनीचा व्यावसायिक वापर (शेती व्यतिरिक्त) करता येतो.
वारसांना किंवा इतरांना जमीन हस्तांतरण करणे सोपे जाते.
अर्ज मंजूर न झाल्यास काय करावे?
अर्ज नाकारल्यास तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्याने त्याचे कारण लेखी स्वरूपात द्यावे लागते.
अपीलसाठी उच्च महसूल अधिकाऱ्यांकडे (उदा. उपविभागीय अधिकारी - SDO यांच्याकडे दाद मागता येते.
अतिशय महत्वाचे
प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १ ते ३ महिने लागू शकतात (परिस्थितीनुसार वेगळा कालावधी लागू शकतो). तसेच जर जमीन शासनाने कोणत्याही अटींसह दिली असेल आणि ती अटी पूर्ण झाल्या नसतील, तर वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतर होऊ शकत नाही. मंजुरी मिळेपर्यंत जमिनीचे विक्री व्यवहार करू नका. सन धोरणानुसार काही विशेष अटी लागू असू शकतात.
(अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल mahabhulekh या संकेतस्थळावर भेट द्या. अथवा तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट द्या.)
हेही वाचा : सासऱ्यांच्या जमिनीवर विधवा सुनेचा हक्क असतो का? वाचा कायदा काय सांगतो
