Join us
Daily Top 2Weekly Top 5

रांगडा कांदा काढणी : कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:40 IST

Kanda Kadhani : शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात... 

Kanda Kadhani : रांगडा कांदा लागवडीपासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) सुमारे ११० ते १२० दिवसांत (जानेवारी-मार्च) काढणीस तयार होतो. कांदाकाढणीला आल्यांनतर काही लक्षणे दिसून येतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात... 

रांगडा कांदा काढणी

  • पिकाची वाढ पूर्ण होऊन, पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. 
  • त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत मिळते. 
  • कांदे घट्ट होतात, वरचा पापुद्रा सुकू कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही. 
  • कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. 
  • अन्यथा मान जास्त वाळली, तर ती कांदा उपटताना तुटतेय परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह दोन ते तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. 
  • प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. 
  • तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सेंमी लांब नाळ (मान) ठेवून कापावी. 
  • नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. 
  • उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत दहा ते बारा दिवस राहू द्यावेत. 
  • या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. 
  • वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. 
  • त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी  

English
हिंदी सारांश
Web Title : Harvesting Onions: Drying period crucial for onion preservation and quality.

Web Summary : Harvest onions when 50-70% of tops fall. Cure in the field for 2-3 days, then cut tops. Cure in shade for 10-12 days to prevent rot and ensure longer storage.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रकाढणीपीक व्यवस्थापन