Rabbi Season : हरभऱ्याच्या शेतात “मर, मूळकूज आणि मानकूज” हे रोग लपून बसलेले शत्रू आहेत. हे रोग बियाण्यांद्वारे व जमिनीद्वारे पसरतात. त्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अनिवार्य असते. नेमकी ही बीजप्रक्रिया कशी करायची, तिचे फायदे काय आहेत, हे समजून घेऊयात...
बीजप्रक्रिया म्हणजे काय?
बियाण्यांना संरक्षक कवच देणे म्हणजेच बीजप्रक्रिया! औषधी व जैविक घटकांच्या साहाय्याने बियाण्यांचे रोगांपासून संरक्षण करून निरोगी अंकुरांची पायाभरणी केली जाते.
बीजप्रक्रियेचे फायदे :
- बियाणे रोगमुक्त राहतात
- उगवण जलद व समसमान होते
- रोपं मजबूत, टणक आणि निरोगी वाढतात
- जमिनीत नत्राची वाढ होते
- स्फुरदाचे शोषण अधिक चांगले
- उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ!
बीजप्रक्रियेचे ३ टप्पे – चरण-दर-चरण मार्गदर्शक
रासायनिक प्रक्रिया :-
थायरम – २ ग्रॅम + कार्बेन्डाझिम – १ ग्रॅम
हे मिश्रण प्रति किलो बियाण्यावर लावा
सावलीत वाळवा (सूर्यप्रकाश टाळा)
जैविक प्रक्रिया :
वाळलेल्या बियाण्यावर रायझोबियम कल्चर – २५ ग्रॅम प्रति किलो लावा.
१ लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ मिसळा.
या मिश्रणात कल्चर मिसळून बियाणे चोळा.
सावलीत वाळवा
PSB प्रक्रिया (फॉस्फेट सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया):-
- PSB – २५० ग्रॅम / १०–१५ किलो बियाणे
- स्फुरदाचा वापर सुधारतो आणि वाढ जोमदार होते
महत्वाच्या सूचना :
- रासायनिक व जैविक प्रक्रिया एकत्र करू नका
- प्रक्रिया नेहमी सावलीत करा
- प्रथम बुरशीनाशक → नंतर कीटकनाशक → शेवटी जीवाणू खत
- प्रक्रिया केलेले बियाणे २४ तासांच्या आत पेरा
मिळणारे फायदे :
- रोगांचा प्रसार थांबतो
- अंकुर दर वाढतो
- रोपं तगडी व निरोगी होतात
- उत्पादनात हमखास वाढ
- कृषी विभाग व आत्मा नाशिक
