Grape Farm : पोंगा अवस्था ही द्राक्ष बागेतील एक महत्त्वाची अवस्था आहे, जी फळछाटणीनंतर साधारणपणे ९ ते १० दिवसांनी येते. या अवस्थेत वेलीवर घड उमलण्याची प्रक्रिया सुरू होते आणि घड दिसू लागतात.
या टप्प्यावर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, ढगाळ वातावरण टाळणे आणि वेलींना आवश्यक असलेले हार्मोन्स योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते, जेणेकरून घड जिरणार नाहीत व वेलीची वाढ चांगली होईल.
पोंगा अवस्थेतील बाग
पोंगा अवस्थेतील बागेत आर्द्रता जास्त प्रमाणात वाढल्यास घड जिरण्याची समस्या जास्त राहील. मुळांच्या कक्षेत पाणी साचल्यामुळे या वेळी बागेत दोन ओळीमध्ये गवत किंवा तण वाढलेले असल्यास आर्द्रता जास्त वाढण्यास मदत होईल.
बोदातील मुळांच्या कक्षेतील पाण्यामुळे वेलीत अंतर्गत जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. वाढलेल्या गवतामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढून काडी व कापसलेल्या डोळ्यांपर्यंत पोचते. कापसलेल्या डोळ्यामधून ही आर्द्रता शोषल्यामुळे अडचणी येतात. घेड जिरण्याची समस्या निर्माण होते.
उपाययोजना
- बागेत दोन ओळीमध्ये चारी घेतल्यास बोदातील पाणी बाहेर निघेल. मुळाच्या कक्षेत हवा खेळती राहील.
- वेळीच गवत काढून घेतल्यास बागेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी राहील.
- ६ बीए हे १० पीपीएम आणि ०-०-५० हे खत अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्वतंत्र फवारण्या करून घ्याव्यात.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी