Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gahu Sathvanuk : गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा? जाणून घ्या सविस्तर 

Gahu Sathvanuk : गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा? जाणून घ्या सविस्तर 

Latest News gahu Sathvanuk moisture content of wheat after threshing Find out in detail | Gahu Sathvanuk : गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा? जाणून घ्या सविस्तर 

Gahu Sathvanuk : गहू मळणीनंतर साठवण्यासाठी ओलावा किती असावा? जाणून घ्या सविस्तर 

Gahu Sathvanuk : गव्हाची मळणी आणि साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात.... 

Gahu Sathvanuk : गव्हाची मळणी आणि साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Gahu Sathvanuk : सद्यस्थितीत अनेक भागात गव्हाची काढणी (Gahu Kadhani) सुरु आहे. हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू कापणी केली जात आहे. दुसरीकडे लागलीच अनेक शेतकरी मळणी देखील करीत आहेत. शेतातून घरी नेऊन व्यवस्थित साठवणूक केली जात आहे. गव्हाची मळणी आणि साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात.... 

गहू मळणी म्हणजे गव्हाच्या देठापासून आणि त्याला झाकणाऱ्या भुसापासून गव्हा वेगळे करणे. ही प्रक्रिया कापणीनंतर आणि विणण्यापूर्वी केली जाते. गहू मळणी यंत्राच्या साहाय्याने केली जाते. काही मोजक्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. 

गहू मळणी करण्याची पद्धत : 

  • मळणी म्हणजे धान्य रोपांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया. 
  • मळणी किंवा घासणे म्हणजे धान्याचा (किंवा इतर पिकाचा) खाण्यायोग्य भाग ज्या पेंढ्याला जोडला जातो, त्यातून सोडण्याची प्रक्रिया.  
  • मळणी काळजीपूर्वक करणे खूप महत्वाचे आहे. 
  • गहू कापणीपासून ते मळणीपर्यंत आणि गव्हाच्या साठवणुकीपर्यंत काळजी घेणे महत्वाचे असते. 
  • मजुरांची टंचाई आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता, शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने कमी वेळेत आणि कष्टात मळणी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

गव्हाची साठवण

  • साठवणूकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे. 
  • त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा. 
  • त्यानंतर साठवण करावी. 
  • शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. 
  • गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. 
  • गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा.  
  • पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. 
  • पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या शीटवर ठेवावीत.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News gahu Sathvanuk moisture content of wheat after threshing Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.