Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > गव्हात एकही उंदीर दिसणार नाही, फक्त हे तीन उपाय करा, बंदोबस्त झालाच म्हणून समजा!

गव्हात एकही उंदीर दिसणार नाही, फक्त हे तीन उपाय करा, बंदोबस्त झालाच म्हणून समजा!

Latest News gahu Pik Undir bandobast Effective measures for rat control in wheat crop | गव्हात एकही उंदीर दिसणार नाही, फक्त हे तीन उपाय करा, बंदोबस्त झालाच म्हणून समजा!

गव्हात एकही उंदीर दिसणार नाही, फक्त हे तीन उपाय करा, बंदोबस्त झालाच म्हणून समजा!

Wheat Crop : गहू पिकातील उंदीर (Rodents in Wheat) ओंब्या येण्याच्या अवस्थेत ३ ते २१ टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात.

Wheat Crop : गहू पिकातील उंदीर (Rodents in Wheat) ओंब्या येण्याच्या अवस्थेत ३ ते २१ टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात.

Wheat Crop :  गहू पिकातील उंदीर (Rodents in Wheat) ओंब्या येण्याच्या अवस्थेत ३ ते २१ टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात. उंदीर प्रामुख्याने पिकाच्या काढणीच्या काळात सर्वात जास्त नुकसान करतात, म्हणून वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे असते. 

गहू पिकातील उंदीर नियंत्रणाचे प्रभावी उपाय : 

  • बांधाची स्वच्छता : शेताचे बांध ३० सेंमी पेक्षा कमी रुंद ठेवावेत आणि बांधावरील उंच गवत काढून टाकावे जेणेकरून उंदरांना लपायला जागा मिळणार नाही.
  • पिंजऱ्यांचा वापर : उंदरांचे बिळे कमी असल्यास पिंजऱ्यात आमिष (उदा. भाजलेले अन्न) ठेवून त्यांना पकडणे हा सुरक्षित उपाय आहे. 
  • उंदराच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषांचा वापर करावा. 
  • आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा ५० भाग त्यात एक भाग झिंक फॉस्फाईड मिसळावे. 
  • यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या सहाय्याने खोलवर टाकावे. 
  • बिळे पालापाचोळा वा गवत टाकून झाकून घ्यावीत व बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : गेहूं के खेतों से चूहों को भगाएं: तीन सरल उपाय

Web Summary : इन तीन प्रभावी तरीकों से गेहूं की फसलों को कृंतक क्षति से बचाएं: खेत की सीमाओं को साफ रखें, जाल का उपयोग करें और बिलों में जिंक फास्फाइड-आधारित विष चारा रणनीतिक रूप से लगाएं। इससे फसल के मौसम में नुकसान कम होगा।

Web Title : Get Rid of Rats in Wheat Fields: Three Simple Solutions

Web Summary : Protect wheat crops from rodent damage with these three effective methods: maintain clean field boundaries, use traps, and strategically apply zinc phosphide-based poison bait in burrows. This will minimize losses during the harvest season.