Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gahu Pik Niyojan : बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, वाण कोणते निवडावे, वाचा सविस्तर 

Gahu Pik Niyojan : बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, वाण कोणते निवडावे, वाचा सविस्तर 

Latest News Gahu Pik Niyojan Read in detail about when horticultural wheat can be sown, which variety to choose | Gahu Pik Niyojan : बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, वाण कोणते निवडावे, वाचा सविस्तर 

Gahu Pik Niyojan : बागायती गव्हाची पेरणी कधीपर्यंत करता येईल, वाण कोणते निवडावे, वाचा सविस्तर 

Gahu Pik Niyojan :

Gahu Pik Niyojan :

रब्बी हंगाम सुरु झाला आहे, या काळात गहू पेरणीसाठी शेतकरी तयारी करीत असतात. बागायती गव्हाच्या पिकाचे नियोजन करण्यासाठी जमीन, बियाणे, पेरणी, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. याचबरोबर पेरणी कधीपर्यंत करावी, कोणते वाण निवडावे,  एकूणच नियोजन समजून घेऊयात.... 

  • बागायती गहू पिकाचे नियोजनासाठी भारी व खाल जमीन निवडून पूर्व मशागत करणे. 
  • जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.
  • जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची पेरणी ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.
  • संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पेरणी २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करावी.
  • संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

 

कोणते वाण निवडावे? 
कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी सुधारित जाती सरबती जाती (जिरायती / कोरडवाहू)- एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)
सरबती जाती (मर्यादित सिंचन) एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान), एन.आय.ए.डब्लू. ३६२४ (फुले अनुपम), एन.आय.ए.डब्लू. ३१७० (फुले सात्विक), एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)
बन्सी जात (कोरडवाहू)- एम.ए.सी.एस.४०२८, एन.आय.डी.डब्लू. १९४९, एम.ए.सी.एस.४०५८
तांबेरा प्रतिकारक- ए.के.डी.डब्लू २९९७-१६ (शरद)

बीज प्रक्रिया करावी 

  • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (७५% डब्लू एस. ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. 
  • बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळ विणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
  • पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. 
  • पेरणी ५ ते ६ सेंमी खोल करावी, त्यामुळे उगवण चांगली होते. 
  • संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवून करावी. 
  • पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करता येते. 
  • बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : गेहूं फसल योजना: बुवाई का समय, किस्में और विस्तृत मार्गदर्शन

Web Summary : सिंचित गेहूं की योजना: भूमि तैयार करें, 5 नवंबर तक बुवाई करें, 75-100 किग्रा बीज/हेक्टेयर का उपयोग करें। नेत्रावती जैसी अनुशंसित किस्में चुनें। बेहतर उपज के लिए बीजों को थीरम और एजोटोबैक्टर से उपचारित करें। बुवाई के दौरान मिट्टी में नमी सुनिश्चित करें।

Web Title : Wheat Crop Planning: Sowing Time, Varieties, and Detailed Guidance

Web Summary : Plan irrigated wheat: Prepare land, sow by November 5th, use 75-100 kg seeds/hectare. Choose recommended varieties like Netravati. Treat seeds with Thiram and Azotobacter for better yield. Ensure soil moisture during sowing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.