Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

latest news Electricity Bill Problems: Electricity bill suddenly increased? Not smart meter, 'this' is the real reason | Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आणि ते कसं टाळाल (Electricity Bill Problems)

Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आणि ते कसं टाळाल (Electricity Bill Problems)

Electricity Bill Problems : सध्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, वीजबिल वाढण्यामागे केवळ स्मार्ट मीटर कारणीभूत नसून, घरातील सदोष अर्थिंग (Earthing) आणि न्यूट्रल लिकेज (Neutral Leakage) ही गंभीर तांत्रिक कारणे असू शकतात.(Electricity Bill Problems)

वीजगळतीमुळे वाढते बिल

घरातील वायरिंगमध्ये बिघाड झाल्यास किंवा अर्थिंग कमकुवत असल्यास वीजप्रवाहाचा काही भाग जमिनीकडे वळतो.

ही वीजगळती (Electric Leakage) आपल्या नकळत सुरू राहते आणि स्मार्ट मीटर ती अचूकपणे नोंदवतो. परिणामी, वापरापेक्षा जास्त युनिट्स बिलात दिसू लागतात.

साधारणपणे वीजपुरवठा फेज आणि न्यूट्रल या दोन तारांद्वारे होतो. फेजमधून वीज उपकरणात जाते आणि न्यूट्रलद्वारे परत येते.

मात्र, न्यूट्रल वायरमध्ये दोष निर्माण झाल्यास किंवा अर्थिंग व्यवस्थित नसल्यास हा प्रवाह व्यवस्थित परत येत नाही आणि काही प्रमाणात वीज जमिनीत गळती होते.

ही आहेत मुख्य कारणे

* जुने किंवा खराब झालेले वायरिंग

* भिंतीतील वायरचे इन्सुलेशन नष्ट होणे

* अर्थिंगचा खड्डा कोरडा पडणे किंवा गंजलेली प्लेट

* फ्रीज, गिझर, इस्त्री यांसारख्या उपकरणांमधील लिकेज

* न्यूट्रल वायरचा इतर सर्किटशी संपर्क

स्मार्ट मीटर कसे काम करते?

स्मार्ट मीटर हे फेज आणि न्यूट्रल दोन्ही वायरमधील वीजप्रवाह वेगवेगळा मोजते. त्यामुळे जरी वीजगळती होत असली तरी ती मीटरमध्ये नोंदली जाते. यामुळे बिल वाढल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात ती गळतीमुळेच असते.

वीजबिल कमी ठेवण्यासाठी उपाय

* घरातील वायरिंगची 'इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट' करून घ्या.

* मेन बोर्डमध्ये RCCB (Earth Leakage Circuit Breaker) बसवा.

* अर्थिंग खड्ड्यात नियमित पाणी, मीठ आणि कोळसा टाका.

* जुनी वायरिंग वेळेवर बदला.

* उपकरणांची नियमित तपासणी करा.

कधी कराल मीटर टेस्ट?

जर घरातील अर्थिंग आणि वायरिंग व्यवस्थित असूनही वीजबिल जास्त येत असेल, तरच महावितरणकडे मीटर तपासणीसाठी अर्ज करावा.

वीजबिल वाढण्यामागे नेहमीच स्मार्ट मीटर जबाबदार नसतो. अनेकदा घरातील लपलेल्या तांत्रिक दोषांमुळेच वीजगळती होते आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसतो. त्यामुळे वेळोवेळी तपासणी आणि योग्य देखभाल केल्यास वीजबिलावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

हे ही वाचा सविस्तर : Ayushman Bharat health scheme : 'आयुष्मान भारत' आणि 'आभा' कार्ड एकच नाही; जाणून घ्या नेमका काय फरक

अधिक वाचा : Vay Vandana Card : वय वंदना कार्ड काढले का? सत्तरीपार ज्येष्ठांसाठी १० लाखांचे 'आरोग्यकवच'

Web Title: latest news Electricity Bill Problems: Electricity bill suddenly increased? Not smart meter, 'this' is the real reason