E Pik Pahani : ई-पीक पाहणी ऑनलाईन नोंदणी ही महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक डिजिटल सुविधा आहे. या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांच्या माहितीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. जशी पिकांची पाहणी करून नोंद केली जाते, तशीच बांधावरील झाडांची देखील या ॲप मध्ये नोंद करता येते.
तर बांधावरील झाडांची नोंदणीची प्रक्रिया पाहुयात...
- सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन E-Pik Pahani ई-पीक पाहणी हे ॲप Install करा.
- ॲप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.
- मोबाईलमधील Access साठी Permission मागितली जाईल, त्यासाठी Allow वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
- पुढे जाऊन लॉग इन करा. यासाठी मोबाईल नंबर आवश्यक राहील.
- यानंतर तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे.
- पुढे एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे. तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि Search या बटनावर क्लिक करा.
- यानंतर बांधावरील झाडांची नोंदणीसाठी प्रक्रिया सुरु होईल.
- यासाठी खाते क्रमांक, गट क्रमांक, बांधावरील झाडे, झाडांची संख्या आदी माहिती भरावी.
- आता तुमची माहिती अपलोड झाल्याचा एक मेसेज दिसेल.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतातील बांधावरील झाडांची नोंद करता येईल.
