E Pik Pahani : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) १ ऑगस्टपासून शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी सुरू आहे. मात्र नोंदणी करतांनाच शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून सर्व्हर डाऊन किंवा अँपमध्ये समस्या येणार नाही.
ई-पीक पाहणी (E Pik Pahani) प्रकल्प विभागाने तयार केलेल्या मोबाइल ॲपद्वारे पिकांचा फोटोसह ऑनलाइन पेरा शेतकऱ्यांद्वारा नोंदविण्यात येतो. ॲप डाउनलोड झाल्यानंतर आधार व मोबाइल नंबर वापरून विभागाची नोंदणीनंतर शेतकरी लॉगिन करावी लागते. त्यानंतर आपल्या नावावरची जमीन निवडा, पीक निवडा, पीक क्षेत्र, पेरणी दिनांक, फोटो इत्यादी माहिती भरावी लागते.
नोंद सेव्ह केल्यावर सातबारावर पिकाची नोंद होते. परंतु, ॲप शेतकरी लॉगीननंतर पुढे जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी लॉगीन पुढे ॲप सरकत नसल्याने खोळंबा वाढला आहे. पुढील गोष्टी मोबाईलमध्ये करून पहा, ई पीक पाहणीत अडचण येणार नाही.
या गोष्टी करा
- आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या ई पीक पाहणी (DCS ) V:4.0.0. App ICON वर Click करा.
- यानंतर दोन पर्याय उपलब्ध होतील, यातील App info हा पर्याय निवडा.
- त्यांनतर Storage and Cache हा पर्याय निवडा - Clear strorage आणि Clear Cache या पर्यायातून माहिती Clear करा.
- त्यानंतर App नव्याने Open करून पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया करा.
- यामुळे Buffering (गोल गोल फिरणे) ची अडचण दूर होणार असून नोंदणी प्रक्रिया जलद रितीने पूर्ण करण्यास मदत होईल.
- अत्यंत महत्वाचे : पीक पाहणी करणे करिता शेतात गेल्यावर आपल्या Mobile चे इंटरनेट Connection चांगले असल्याची खात्री करा.
- नोंदणी करतांना पहिला OTP प्राप्त होणेसाठी इंटरनेट Connection चांगले असणे गरजेचे आहे.
- उर्वरित पीकपाहणी Offline Mode मध्ये करता येईल.
- पूर्ण केलेली पीक पाहणी अपलोड करते वेळी इंटरनेट Connection आवश्यक आहे.