Grape Cultivation : द्राक्ष लागवडीपूर्वी (किमान १ वर्ष आधी) माती व पाणी परीक्षण करणे दर्जेदार उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड करणार आहोत, तेथील मातीमध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही जाणून घेतली पाहिजे.
द्राक्ष - लागवडपूर्व माती व पाणी परीक्षण
- बऱ्याच बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण कमी अधिक आढळून येते.
- या चुनखडीच्या उपलब्धतेमुळे वेलीस अन्य अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा येतात किंवा खंडित होतो.
- परिणामी, वेलीचे उत्पादन कमी राहते. काही परिस्थितीमध्ये वेलीचे आयुष्यही कमी होते.
- बऱ्याच ठिकाणी बोअरवेल व विहिरीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते.
- अशा पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
- पाण्यातील अधिक क्षारांमुळे वेलीची शाकीय वाढ होत नाही, तर काही स्थितीमध्ये पानांवर स्कॉर्चिग येते. यामुळे उत्पादनामध्ये घट येते.
- आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थितीमध्ये योग्य खुंटाची निवड महत्त्वाची असते.
- याकरिता लागवडीपूर्वी माती व पाणी तपासून घेणे गरजेचे समजावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी
