Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Latest News Do these things during the fruit growth and ripening stage of the pomegranate orchard, read in detail | डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

डाळिंब बागेच्या फळ वाढ आणि पक्वतेच्या अवस्थेत या गोष्टी करा, वाचा सविस्तर 

Pomegranate Crop Management : डाळिंब मृग बहारातील बागेची अवस्था फळ वाढ आणि पक्वता या दरम्यान नियोजन..

Pomegranate Crop Management : डाळिंब मृग बहारातील बागेची अवस्था फळ वाढ आणि पक्वता या दरम्यान नियोजन..

डाळिंब मृग बहार (बागेची अवस्था फळ वाढ आणि पक्वता) - बागेची मशागत

  • फळबागेतून पाण्याचा संपूर्ण निचरा झालेला असावा. 
  • जास्त पावसामुळे झाडांच्या मुळांच्या जवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गुच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत. 
  • फळांनी भरलेल्या फांद्यांना आधार देण्यासाठी योग्य स्टेकिंग किंवा आधार करावा.
  • फळांच्या योग्य वाढ व वजन मिळण्यासाठी गच्छामधील जास्त आणि गरजेपेक्षा अधिक फळे काढावीत पाच वर्षांच्या झाडासाठी प्रति झाड सुमारे ८० ते १०० फळे घ्यावीत. 
  • जास्त आर्द्रतेमुळे फळे गळण्याची समस्या उद्भवू शकते. 
  • तसेच फळांची परिपक्वता आणि चांगला रंग येण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
  • लवकर मृग बहार घेतलेल्या बागेमध्ये फळ पूर्ण पक्व होऊन सालीचा व दाण्यांचा रंग विकसित झाला असल्यास, फळगळ आणि बुरशीचे डाग टाळण्यासाठी वेळेत फळ तोडणी करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
०-५२-३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १५-२० दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात. मॅगनीज सल्फेटच्या ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. प्रति एकरी ०-५२-३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) ५.१२ किलो, युरिया १२.५६ किलो आणि ०-०-५० (पोटॅशिअम सल्फेट) ४.६ किलो याप्रमाणे आठवड्याच्या अंतराने दहावेळा ड्रिपद्वारे द्यावे.

- ग्रामिण कृषि मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.
 

Web Title: Latest News Do these things during the fruit growth and ripening stage of the pomegranate orchard, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.