Lokmat Agro >स्मार्ट शेती > Dalimb Crop Management : डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर 

Dalimb Crop Management : डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर 

Latest News Dalimb Crop Management these' symptoms are seen in pomegranate crop, spray as follows, read in detail | Dalimb Crop Management : डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर 

Dalimb Crop Management : डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर 

Dalimb Crop Management : डाळिंब कीड रोग व्यवस्थापन (Pomegranate pest disease management) करताना काय-काय काळजी घ्यावी?  हे या लेखातून पाहुयात.... 

Dalimb Crop Management : डाळिंब कीड रोग व्यवस्थापन (Pomegranate pest disease management) करताना काय-काय काळजी घ्यावी?  हे या लेखातून पाहुयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Dalimb Crop Management :डाळिंबाच्या बागेतील रोग-कीडांचे प्रादुर्भाव (Pomegranate Crop) आणि लक्षणे ओळखावीत. त्यानुसार व्यवस्थापन करणे सोयीस्कर ठरते. डाळिंब बागांवर प्रामुख्याने खोडकिडा, पिन होल बोरर यासह वाळवी आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असतो. अशावेळी कीड रोग व्यवस्थापन (Pomegranate pest disease management) करताना काय-काय काळजी घ्यावी?  हे या लेखातून पाहुयात.... 


किड व्यवस्थापन

विश्रांती काळामध्ये बागेची नियमित पाहणी करावी. बागेमध्ये खोडकिडा, पिन होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास गरजेनुसार १५ ते २० दिवसांच्या अंतराने योग्य फवारणी करावी. या प्रमाणे व्यवस्थापन हे किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यावरच करावे.

विश्रांती काळामध्ये झाडांना खालीलप्रकारे पेस्ट बनवून लावावी.

लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २० मि.ली. अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा १०% बोर्डो पेस्ट अधिक क्लोरोपायारीफॉस (२० ईसी) २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे वापरुन तयार केलेली पेस्ट झाडाच्या खोडाला जमिनीपासून २-२.५ फुटांपर्यंत लावावी.

रसायनांच्या वापरासाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने प्रकाशित केलेल्या अॅड-हॉक लिस्टचा वापर केला जाऊ शकतो.

रोग व्यवस्थापन

  • विश्रांतीच्या काळात १० ते १५ दिवसांच्या अंतराने खालील फवारण्या हवामान आणि पीक समस्यांनुसार घ्याव्यात.
  • १% बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २-२.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साईड (५३.८ डब्ल्यूपीद) २ ग्रॅम किंवा ब्रोनोपॉल (९५%) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून वापरावीत. 
  • बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा इतर योग्य बुरशीनाशकाची एक फवारणी अॅग्रोकेमिकल्सच्या अॅड-हॉक सूचीमध्ये नमूद केलेल्या बुरशीनाशकांपैकी घेतली जाऊ शकते. 
  • बोर्डो मिश्रण सोडून सर्व ओषधांमध्ये फवारणीवेळी चांगल्या प्रतीचे स्टिकर स्प्रेडर ०.२५ मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा व विभागीय कृषी सेवा केंद्र इगतपुरी 

Web Title: Latest News Dalimb Crop Management these' symptoms are seen in pomegranate crop, spray as follows, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.