Dalimb Bag : डाळिंबाच्या झाडावर नवीन पालवी येणे किंवा फुलकळी दिसणे हे झाडाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, ज्यासाठी योग्य वेळी छाटणी, ताण देणे आणि पोषक तत्वांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
डाळिंबाची फुलकळी येण्याची अवस्था मृग बहरात (मे-जून) किंवा आंबे बहरात (जानेवारी-फेब्रुवारी) येते, यासाठी हवामानानुसार पाणी व खतांचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. सद्यस्थितीत डाळिंब बागेचा हस्त बहार सुरु असून बाग नवीन पालवी आणि फुलकळीची अवस्थेत आहेत.
हस्त बहर (बागेची अवस्था नवीन पालवी आणि फुलकळीची अवस्था)
- नवीन पालवी आणि फुलकळी येताना, नॅप्थील ॲसेटीक ॲसिड (एन.ए.ए.) (४.५ एसएल) २२.५ मि.लि. प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यास चांगली फुलधारणा होते.
- सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण ४०० ते ६०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारावे.
- विद्राव्य खते नत्र स्फुरद-पालाश, ०-५२-३४ ४.४ किलो आणि ०-०-५० ४.४ किलो प्रति एकर प्रति वेळ याप्रमाणे आठवड्याच्या अंतराने सातवेळा ड्रिपद्वारे सोडावे.
- जिप्सम १.१४ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ३०० ग्रॅम प्रति झाड मातीत मिसळावे. खते दिल्यानंतर लगेचच हलके पाणी द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी