Compost Fertlizer : अनेक शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांपैकी हुमणी अळी, तण व्यवस्थापन इत्यादी असे लक्षात आले आहे की, काही शेतकरी शेतातील काडी कचरा, तण, जनावरांचे शेण यांची व्यवस्थित विल्हेवाट लावत नाहीत, त्यासाठी कंपोस्ट निर्मिती तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकेल.
- कंपोस्ट खत निर्मितीसाठी खड्डा १ मीटर खोल. २ मीटर रुंद आणि ३ मीटर लांब असा करावा.
- असे खड़े शेतात सुविधा २ एकराला १ खड्डा असणे आवश्यक आहे. खड्डा शेताच्या शेवटी उंच भागात असावा.
- खड्डा भरताना शेतातील काडी कचरा तहान अकरात तुकडे करून पहिल्या दिवशी खालचा थर भरून त्यावर सुद्धा १ किलो युरिया, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणखाळा शिंपडावे.
- दुसऱ्या दिवशी खालच्या थर भरून, त्यावर सुद्धा १ किलो युरिया, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणकाळा शिंपडावे.
- तिसऱ्या दिवशी तिसरा थर भरून त्यावर सुद्धा १ किलो युरिया, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो शेणकाळा शिंपडावे.
- त्यावर शेवटी आच्छादन करून खड्डा मातीने बंद करावा,
- एका महिन्याने खड्डयातील सर्व काडी कचरा चांगला मिश्रित करून घ्यावा. आणि खड्डा परत बंद करावा.
- दोन महिन्याने पुन्हा एकदा खड्डयातील काडी कचरा चांगला मिरळ करावा आणि खड्डा परत बंद करावा.
- तिसऱ्या महिन्यात १० दिवसानंतर खड्डयातील तापमान तपासावे.
- उष्ण असल्या कुजण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे समजावे आणि खड्डा जास्त तसे राहू द्यावा.
- ज्यावेळी ते थंड असल्याचे लक्षात येईल, तेव्हा खत पूर्णपणे कुजलेले आहे, असे समजावे. असे कुजलेले शेणखत शेतात वापरण्यासाठी हरकत नाही.
रचना समजून घेऊयात..
खड्याची घर रचना (खालून वर)
तिसरा थर (काडी कचरा)
+ १ किलो युरिया २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट
+ १० किलो शेणकाळा
दुसरा थर (काडी कचरा)
+ १ किलो युरिया + २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट
+ १० किलो शेणकाळा
पहिला थर (काडी कचरा)
+ १ किलो युरिया २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट
+ १० किलो शेणखत
लक्षात ठेवावे
- खड्डा नेहमी उंच, पावसाचे पाणी न साचणाऱ्या ठिकाणी करावा.
- काही कचरा छोटया तुकडयात पारडून वापरावा.
- युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणकाळा प्रमाणप्रमाणात प्रत्येक थरावर शिंपडावे.
- खड़ा वेळीवेळी ओलसर ठेवावा (पाणी न साचता).
- कंपोस्ट पूर्णपणे काळवट, भुसभुशीत व वासरहित झाले की तयार समजावे.
- कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर जि. हिंगोली
