Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bij Prakriya : शेतकरी दादा! पेरणीच्या आधी बियाण्यांवर 'हा' प्रयोग कराच, कारण.... 

Bij Prakriya : शेतकरी दादा! पेरणीच्या आधी बियाण्यांवर 'हा' प्रयोग कराच, कारण.... 

Latest news Bij Prakriya farmers experiment on seeds before sowing | Bij Prakriya : शेतकरी दादा! पेरणीच्या आधी बियाण्यांवर 'हा' प्रयोग कराच, कारण.... 

Bij Prakriya : शेतकरी दादा! पेरणीच्या आधी बियाण्यांवर 'हा' प्रयोग कराच, कारण.... 

Bij Prakriya : भिमा दादा आणि पारु अक्काने पेरणीआधी बियाण्यांवर नेमकी काय प्रक्रिया केली?

Bij Prakriya : भिमा दादा आणि पारु अक्काने पेरणीआधी बियाण्यांवर नेमकी काय प्रक्रिया केली?

शेअर :

Join us
Join usNext

Bij Prakriya : तुमच्याकडे पाऊस (Rain) पडलाय का? होय, पण लक्षात ठेवा, तो उन्हाळ्यातला पाऊस होता. खरीपासाठी हवा असतो, आपला हक्काचा मान्सून! आणि त्याच वेळी आपण खरीप पिकांची (Kharif Season) पेरणी करणार आहोत. पण सावधान!

जर आपण घाईघाईने पेरणी केली आणि पाऊस काहीसा थांबला, तर पुन्हा आभाळाकडे डोळे लावून बसावं लागेल.
भिमा दादा आणि पारु अक्का एवढं लवकर बियाण्यांना (Seed Treatment) औषध का लावतायत?
मंडळी, काल भिमा दादा आणि पारु अक्का शेतीशाळेत आले होते.
तेव्हा त्यांनी तज्ज्ञांकडून बिजप्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
भिमा दादा म्हणाले, “हे तर एकदम बेस्ट हाय! पण पेरणीच्या वेळी लय घाई असते, मग हे कधी करायचं?”
त्यावर तज्ज्ञांनी सांगितलं, “ही बिजप्रक्रिया आपण आधीच करून ठेवू शकतो ना!”
चला तर मग मंडळी, आपणही ही सगळी माहिती समजून घेऊ.

बिजप्रक्रिया म्हणजे काय?
बिजप्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक किंवा जैविक औषध लावून त्यांची : 
उगमशक्ती (Germination) वाढवणे
रोगप्रतिकारक क्षमता सुधारणा
उत्पादनक्षमता वाढवणे
ही एक अत्यंत उपयुक्त प्रक्रिया आहे.
यात आपण बुरशीनाशक, कीटकनाशक, आणि जैविक जिवाणू संवर्धक यांचा वापर करतो.

बिजप्रक्रिया कशी करावी?
1. रासायनिक बिजप्रक्रिया (Chemical Seed Treatment):

बुरशीनाशक:
थायरम – 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे
कार्बेन्डाझिम – 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे
कीटकनाशक (जर आवश्यक असेल तर):
इमिडाक्लोप्रिड 70 डब्ल्यूएस – 5 मि.लि. प्रति किलो बियाणे

2. जैविक बिजप्रक्रिया (Bio-seed Treatment) :
ट्रायकोडर्मा विरिडी – 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे
प्स्युडोमोनास, अझोटोबॅक्टर, रायझोबियम यासारख्या जैविक घटकांचा वापर

बिजप्रक्रिया कधी करावी?
रासायनिक प्रक्रिया आपण पेरणीपूर्वी अगदी एक महिना आधी सुद्धा करून ठेऊ शकतो.
मात्र जैविक प्रक्रिया नेहमी पेरणीच्या दिवशीच करावी.
हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे!

लक्षात घ्या:
पिकानुसार कोणती औषधे वापरायची याबाबत आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

तयारी आत्ताच करा!
भिमा दादा आणि पारु अक्का यांनी आधीच बियाण्यांची शिफारशीनुसार बिजप्रक्रिया केली आहे.
म्हणूनच पेरणीच्या वेळी त्यांना कोणतीही घाई होणार नाही. तुम्हीही अशीच तयारी आत्ताच करा!

- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी 
    आडगाव चोथवा, ता. येवला, जि. नाशिक

Web Title: Latest news Bij Prakriya farmers experiment on seeds before sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.