Join us

Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 21:00 IST

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. या काळात कसे नियोजन करावे..

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही पिकात ओल असल्याने कापणी दोन-तीन दिवस पुढे ढकलली आहे. अशा सद्यस्थितीत भात पिकावर उतबत्त्या, काजळी, बुरशीजन्य व विषाणूजन्य करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

  • भात पिकावरील उतबत्त्या रोगाच्या नियंत्रणासाठी टोपाझ किंवा हेक्साकोनाझोल ०.१% @ १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • काजळी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल ०.१% @ १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बुरशीजन्य पानावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (सीओसी) ४५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमाइसिन ६ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडाझिम ०.१% @ १ ग्रॅम डायथेन एम-४५ ०.२५% @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • भाताच्या काही जाती पक्व झाल्या तरी हिरव्या दिसतात. म्हणून कापणीस उशीर करू नये. त्यामुळे दाणे खडतात तसेच भरडताना कणी जास्त होते.
  • वेळेवर लागवड केलेल्या भात पीकात काढणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.
  • पीक निसवल्यावरसाधारणपणे २५ ते ३० दिवसांनी ओंबीतील ८० ते ९०% दाणे पक्व झाल्यावर भाताची कापणी करावी. 
  • वैभव विळ्याचा वापर यासाठी करावा. यामुळे खोडकिडीचे नियंत्रण होते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

English
हिंदी सारांश
Web Title : Rice Harvesting Begins: Why Use 'Vaibhav' Sickle? Planning Tips.

Web Summary : Rice harvesting commences amidst disease concerns. Control outbreaks with recommended fungicides. Harvest promptly to avoid grain loss. Drain fields pre-harvest. 'Vaibhav' sickle aids pest control.
टॅग्स :भातकाढणीशेती क्षेत्रपीक व्यवस्थापननाशिक