Bhajani Mandal Yojana : आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यात भजनी मंडळ पाहायला मिळते. तुमच्या गावात वारकरी संप्रदाय असेल, जो भजन, कीर्तन यातून समाजाचे प्रबोधन करत असतो. अशा भजनी मंडळांना वर्षाला २५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील १८०० भजनी मंडळास प्रथम टप्प्यात प्रत्येकी रुपये २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अनुदानातून भजनी मंडळांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या संगीत वाद्यांची उदा. हार्मोनियम / मृदंग/पखवाज /वीणा/तंबोरा / एकतारी / टाळ व इतर अनुषंगिक साहित्य खरेदी करणे आवश्यक राहील.
यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- राज्यातील भजनी मंडळांना २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- आपली नोंदणी http://mahaanudan.org या संकेतस्थळावर जाऊन करावी.
- या वेबसाईटवर गेल्यावर संस्था / भजनी मंडळ नोंदणी असा पर्याय दिसेल.
- सुरवातीला तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल, त्यासाठी तेथील संबंधित पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर विभाग निवडा (जसे की नाशिक), जिल्हा निवडा, तालुका निवडा, नगरपरिषद निवडा, संस्था किंवा भजनी मंडळाचे नाव टाका, भजनी मंडळाचा पत्ता टाका, मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
अशा पद्धतीने नोंदणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया करा.
भजनी मंडळाच्या पथकांचे पात्रतेचे निकष ;
- १. एका वर्षात किमान ५० कार्यक्रम सादर करणारी व पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे असावीत.
- २. अनुदानाच्या रकमेनुसार कलापथकांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील.
- ३. भजनी मंडळामध्ये किमान २० सदस्य असावेत.
- ४. भजनांच्या कार्यक्रमांचे पुरावे उदा. आयोजकाचे पत्र, प्रमाणपत्र हँडवील, ग्रामपंचायत दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा इतर सक्षम पुरावे ग्राह्य धरण्यात येतील.
- ५. एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्था किमान ३ वर्षानंतर पुन्हा अनुदानाकरीता अर्ज करु शकते. सदर अनुदान जास्तीत जास्त एका पथकास दोनवेळा अनुज्ञेय होईल.
- ६. भांडवली खर्चासाठी अनुदान प्रत्येक कलापथकाला जास्तीत जास्त २ वेळा देय राहील.
- ७. अर्ज करण्याची पध्दत व निवड प्रक्रिया-भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याबाबत mahaanudan.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज दाखल करण्याऱ्या पथकास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार असेल. निकषांची पुर्तता करणाऱ्या व ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्या १८०० भजनी मंडळांची निवड करण्यात येईल.
- ८. सदर भांडवली अनुदानासाठी पथकांनी ऑनलाईन अर्ज भरता येतील. अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी अनुज्ञेय असेल. भांडवली खर्चासाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय शासनाचा राहील. सदर योजनेचा तीन वर्षांनंतर आढावा घेण्यात येईल.
- ९. संदर्भाधीन दिनांक ०१.०१.२००८ रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये भजनी मडळ पथकांना भांडवली अनुदान या बाबीचा समावेश नव्याने केलेला असल्याने भजन क्षेत्रातील २ तज्ञांचा समावेश पूर्वीच्या समितीमध्ये करण्यात येईल.
- १०. कलापथकांना पूर्वीप्रमाणेच व पूर्वीच्याच अटी, शर्ती व निकषानुसार भांडवली अनुदान देय राहील.
दहावी उत्तीर्ण आहात, गावातच काम मिळणार, दीड लाख अनुदान मिळतंय, इथं अर्ज करा