Join us
Daily Top 2Weekly Top 5

बासमती आणि इंद्रायणी तांदूळ कुठे पिकवला जातो, या दोन्हीत फरक काय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:20 IST

Basmati And Indrayani Rice : आज प्रत्येकाच्या आहारात तांदूळ म्हणजेच शिजवलेला भात हा दिसून येतो. यात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाला विशेष पसंती असते.

Basmati And Indrayani Rice :    भात हे प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. त्यातही तांदूळ निघाल्यानंतर त्यास विशेष डिमांड असते. आज प्रत्येकाच्या आहारात तांदूळ म्हणजेच शिजवलेला भात हा दिसून येतो. तांदळाचे अनेक प्रकार पडतात. 

यात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाला विशेष पसंती असते. मग या दोन्ही तांदळात फरक काय आणि ते कुठे पिकवले जातात, या दोन्हीपैकी कुठला तांदूळ महाग मिळतो, हे या लेखातून पाहुयात... 

बासमती तांदळाबाबत.... 

  • उगम : बासमती तांदळाचे मूळ ठिकाण हे उत्तर भारतातील आणि पाकिस्तानमधील हिमालयीन खोऱ्यातील सुपीक जमीन आहे. 
  • भारत हा बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. 
  • हिमालयाच्या पायथ्याशी, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांसारख्या भागांमध्ये पिकतो.
  • वैशिष्ट्ये : लांब दाणे, शिजल्यावर मोकळे होतात, उत्कृष्ट सुगंध.
  • उपयोग : बिर्याणी, पुलाव, फ्राइड राइस, खीर यांसारख्या पदार्थांसाठी आदर्श.

 

इंद्रायणी तांदळाबाबत : 

  • उगम : 'अंबेमोहर' या जातींच्या संकरातून तयार झाला आहे. इंद्रायणी नदीच्या नावावरून नाव. 
  • प्रामुख्याने महाराष्ट्रात पिकवला जातो. विशेषतः पुणे आणि नाशिक भागात लोकप्रिय.
  • वैशिष्ट्ये : मध्यम दाणे, शिजल्यावर किंचित चिकट होतात, छान सुगंध आणि चव.
  • उपयोग : खिचडी, डोसा, इडली, चिल्ला, आणि चिकन/फिश करीसोबत खाण्यासाठी उत्तम.
  • फायदे : कमी GI (Glycemic Index) असलेला, पचनास हलका आणि कमी पाण्यावर शिजतो. 

 

या दोन्हीमधील फरक : दाणा : बासमती लांब, इंद्रायणी मध्यम.पोत (Texture) : बासमती मोकळा, इंद्रायणी थोडा चिकट/मऊ.वापर : बासमती खास पदार्थांसाठी, इंद्रायणी रोजच्या जेवणासाठी आणि नाश्त्यासाठीही. 

या दोन्हींचे दर कसे आहेत? 

बासमती (प्रति क्विंटल) : कमीत कमीत ७ हजार ३०० रुपये, सरासरी ९ हजार ७५० रुपये प्रति किलो   : ७० रुपये किलो 

इंद्रायणी तांदूळ (प्रति किलो) : ६५ रुपये किलो साधारण प्रति क्विंटलला ६ हजार रुपये ते ७ हजार रुपये 

 

Sharbati Wheat : सिहोर आणि शरबती गहू कुठे पिकवला जातो, या दोन्ही गव्हामधील फरक काय आहे?

English
हिंदी सारांश
Web Title : Basmati vs Indrayani Rice: Differences, regions, price comparison explained.

Web Summary : Basmati and Indrayani rice differ in grain size, texture, and usage. Basmati, grown in North India, is fluffy and used in biryani. Indrayani, from Maharashtra, is slightly sticky and good for everyday meals. Basmati is pricier.
टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीनाशिकपुणे