Lokmat Agro >स्मार्ट शेती > Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Latest News amba Lagvad What fertilizers should you give to your mango farm see details | Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Amba Lagvad : आंबा बाग खत व्यवस्थापनासाठी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते देणे महत्त्वाचे आहे.

Amba Lagvad : आंबा बाग खत व्यवस्थापनासाठी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते देणे महत्त्वाचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Amba Lagvad : आंबा बाग खत व्यवस्थापनासाठी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते देणे महत्त्वाचे आहे. नवीन लागवडीसाठी शेणखत आणि रासायनिक खतांचा वापर करावा. आजच्या भागातून नेमकी कोणकोणती खते द्यावीत? आणि कशी द्यावीत? हे समजून घेऊयात... 

आंबा बाग खत व्यवस्थापन 

  • पावसाची तीव्रता कमी असताना झाडास खते द्यावीत. 
  • एक वर्षाच्या आंबा कलमास ५ किलो शेणखत ३२५ ग्रॅम युरिया, ३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १६६ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रति कलम द्यावी. 
  • हे प्रमाण दरवर्षी समप्रमाणात वाढवत न्यावे. 
  • दहा वर्षांवरील प्रत्येक आंबा कलमांस ५० किलो चांगले कुजलेले शेणखत ३ किलो २५० ग्रॅम युरियाए ३ किलो १२५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १ किलो ६६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रती कलम बांगडी पद्धतीने द्यावी. 
  • खते कलमाच्या विस्ताराच्या आत सुमारे ४५ ते ६० सें.मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. 
  • या सोबतच २०० ग्रॅम अॅझेटोबॅक्टर व २०० ग्रॅम पी.एस.बी. शेणखतामध्ये मिसळून द्यावे. 
  • चरामध्ये प्रथम पालापाचोळाए शेणखत त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावेत. 
  • पालाश खताची मात्रा सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून दिल्यास फळांमध्ये साका येण्याचे प्रमाण कमी होते. 
  • आंबा लागवडीमध्ये सुरवातीच्या काळात उत्पादन मिळण्यासाठी नाचणी, वरई, तीळ, भुईमूग, भाजीपाला, कंदपिके इत्यादींची लागवड करता येते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News amba Lagvad What fertilizers should you give to your mango farm see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.