Amba Bag Management : आंबा हंगामपूर्व व्यवस्थापनामध्ये छाटणी, खत व्यवस्थापन, आणि कीड-रोग नियंत्रण यांचा समावेश होतो. याचबरोबर बागेत किंवा झाडांसाठी कुठली कामे करावीत किंवा करणे गरजेचे असते, ते पाहुयात.
आंबा हंगामपूर्व व्यवस्थापन
- आंबा बागेतील गवत काढून बागेची साफसफाईची कामे करावीत.
- जेणेकरून बागेतील जमिनीमध्ये असलेला ओलावा लवकर कमी झाल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया सुरु होण्यासाठी झाडाच्या मुळांना आवश्यक असलेला ताण बसण्यास मदत होईल.
- बागेची साफसफाई करताना बागेतील सुकलेल्या, निर्जीव आणि रोगग्रस्त फांद्या काळजीपूर्वक काढून टाकाव्यात.
- आंब्याच्या झाडांवर नियमित मोहोर येण्यासाठी 'बेसिन एक्सपोजर' ही प्रक्रिया करावी.
- यासाठी आंबा झाडाच्या बुंध्यालगतची जमीन झाडाच्या बुंध्यापासून सुमारे १.५० मीटर अंतरापर्यंत आणि १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंत उकरावी.
- झाडाच्या बुंध्यालगतची जमीन पॉवर टिलर किंवा कुदळ यांच्या सहाय्याने उकरू शकतो.
- बेसिन एक्सपोजरमुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे झाडावर मोहोर येण्यासाठी आवश्यक असलेला ताण निर्माण होतो.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी सेवा केंद्र, इगतपुरी
