Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : सर्वदूर मुसळधार, शेतात पावसाचे पाणी साचल्यास, पहिल्यांदा हे काम करा! 

Agriculture News : सर्वदूर मुसळधार, शेतात पावसाचे पाणी साचल्यास, पहिल्यांदा हे काम करा! 

Latest News Agriculture News rain water accumulates in farming | Agriculture News : सर्वदूर मुसळधार, शेतात पावसाचे पाणी साचल्यास, पहिल्यांदा हे काम करा! 

Agriculture News : सर्वदूर मुसळधार, शेतात पावसाचे पाणी साचल्यास, पहिल्यांदा हे काम करा! 

Agriculture News : पावसाचे पाणी साचले असल्यास काय करावे? जेणेकरून पिकांवर परिणाम होणार नाही. 

Agriculture News : पावसाचे पाणी साचले असल्यास काय करावे? जेणेकरून पिकांवर परिणाम होणार नाही. 

Agriculture News : सर्वदूर पाऊस सुरु असल्याने अनेक पिकांना फटका (Monsoon Rain) बसण्याची शक्यता आहे.  भात, मका, सोयाबीन, बाजरी, मुग व कापूस इत्यादी पिकांची पेरणी सुरु आहे. 

अशातच जोरदार पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी साचले असल्यास काय करावे? जेणेकरून पिकांवर परिणाम होणार नाही. 

खरीप भात, मका, सोयाबीन, बाजरी, मुग व कापूस

  • खरीप भात पिकाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर पेरणी केलेल्या रोपवाटिकेत तसेच मका, सोयाबीन, बाजरी, मुग व कापूस पिकात पाणी साचले असल्यास त्वरित बाहेर काढणे गरजेचे आहे. 
  • पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. 
  • पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल.

 

डाळिंब बागेसाठी...... 

  • डाळिंब बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे. 
  • त्याकरिता पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पध्दतीने चर काढावेत. 
  • पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येईल. 
  • डाळिंब बागांचे सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरिता बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार द्यावा. 
  • प्लॅस्टिक दोरीच्या साह्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.

आंबा बागेसाठी... 

  • तोडणी साठी तयार, नकुजलेल्या फळांची काढणी करावी. ती तात्काळ विक्रीसाठी पाठवावीत. 
  • चिरलेली, नुकसानग्रस्त, कुजलेली फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. 
  • मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह, जोरदार पाऊस तसेच सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज लक्ष्यात घेता आंबा बागेतील जास्तीचे पाणी काढून टाकावे. 
  • जमिनीवर पडलेला काडीकचरा, पालापाचोळा व खराब / सडलेली फळे गोळाकरून नष्ट करून बागेला स्वच्छ ठेवावे. 
  • आंबाबागांचे सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरिता बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार द्यावा. 
  • प्लॅस्टिक दोरीच्या साह्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Agriculture News rain water accumulates in farming