Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > ज्वारी - कणसातील अळ्यांचे नियंत्रण, मका - फुलोऱ्यात असल्याने सिंचन पुरवठा कसा कराल? 

ज्वारी - कणसातील अळ्यांचे नियंत्रण, मका - फुलोऱ्यात असल्याने सिंचन पुरवठा कसा कराल? 

Latest news agriculture News How to manage sorghum and maize crops in Rabi season | ज्वारी - कणसातील अळ्यांचे नियंत्रण, मका - फुलोऱ्यात असल्याने सिंचन पुरवठा कसा कराल? 

ज्वारी - कणसातील अळ्यांचे नियंत्रण, मका - फुलोऱ्यात असल्याने सिंचन पुरवठा कसा कराल? 

Agriculture News : रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका पीक वाढीच्या अवस्थेत असून या काळात या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन कसे करावे

Agriculture News : रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका पीक वाढीच्या अवस्थेत असून या काळात या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन कसे करावे

Agriculture News :    रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका पीक वाढीच्या अवस्थेत असून या काळात या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, फवारण्या काय कराव्यात, सिंचन सुविधा कशी करावी, याबाबत माहिती घेऊयात... 

रब्बी ज्वारी

  • ज्वारी पीक कणसांमध्ये दाणे भरण्याची अवस्थेत आहे. अशावेळी काय काळजी घ्यावी, हे पाहुयात... 
  • ज्वारी पिकाच्या फुलोरा ते दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत कणसातील अळ्या या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. 
  • तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड वाळते. 
  • अळ्या दुधाळ अवस्थेतील दाणे खातात. विष्ठेमुळे दाण्याची प्रत खराब होते. 
  • म्हणून २० अळ्या प्रति कणीस आढळल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २ मिली प्रति लिटर पाणी मिसळून याप्रमाणे फवारणी करावी.
  • पहिला पंधरवडा - पक्ष्यांपासून संरक्षण करावे (पक्षीथांबे /मचाण बसविणे).

रब्बी मका
मका पीक तुरे लागण्याच्या अवस्थेत असून या काळात पाणी देण्याचं नियोजन व्यवस्थित करता आले पाहिजे. ते कसं करायचं, समजून घेऊयात... 

सिंचन

  • मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक असते. 
  • मका पीक पाण्याच्या ताणास संपूर्ण कालावधीमध्ये संवेदनशील आहे. 
  • संवेदनशील अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा उत्पादनात लक्षणीय घट येते. 
  • पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे. 
  • म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. 
  • मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. 
  • म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता अधिक असते.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

Web Title : ज्वार में कीट नियंत्रण, मक्का में फूल आने पर सिंचाई से बेहतर उपज।

Web Summary : रबी ज्वार में बाली की इल्लियों को कीटनाशक स्प्रे से नियंत्रित करें। मक्का में फूल आने के दौरान पानी की कमी से बचने के लिए सिंचाई करें, जिससे अनाज ठीक से भरे और उपज अधिक हो, इगतपुरी के विशेषज्ञों का कहना है।

Web Title : Control pests in sorghum, irrigate maize during flowering for better yield.

Web Summary : Manage Rabi sorghum by controlling earhead caterpillars with insecticide sprays. Irrigate maize during flowering to avoid water stress, ensuring proper grain filling and higher yields, says experts from Igatpuri.