रत्नागिरी: कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने 'वेंगुर्ला १०' हे नवीन वाण विकसित केले आहे.
उत्पादन, चव, उत्पन्न सर्व स्तरावर हे वाण सरस ठरले असून, लवकरच या वाणाची कलमे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जानेवारीपासूनच ओल्या काजूचा हंगाम सुरू होतो. गावठी काजूचा हंगाम उशिरा सुरू होतो. विद्यापीठ प्रमाणित 'वेंगुर्ला ६ व ७' चा हंगाम लवकर सुरू होतो. मात्र, या जातीच्या काजू बीच्या टरफलाची साल जाड असते.
शिवाय तेलाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे गर काढायला त्रास होतो, शिवाय त्वचेवर डाग पडतात. त्यामुळे वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने संशोधन करून नवीन 'वेंगुर्ला १०' जात खास ओल्या काजूगरासाठी विकसित केली आहे.
यामध्ये तेलाचे प्रमाण कमी आहे, त्वचेवर काही परिणाम होत नाही. शिवाय गर सहज कुणीही काढू शकेल इतकी साल पातळ आहे. वैशिष्ट्य म्हणजे काजू, कलम लागवडीनंतर तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन सुरू होते.
विद्यापीठाने विकसित केलेल्या उत्तम उत्पन्न देणाऱ्या काजूच्या जातीपैकी हे वाण आहे. केवळ ओल्या काजूगरासाठी नाही तर प्रक्रिया, थेट खाण्यासाठीही उत्तम आहे.
एका किलोमध्ये ११४ ते ११५ ओली काजू बी येतात, तर एका किलोला २५५ ते २५६ ओले काजूगर मिळतात. हा काजू खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे.
त्यामुळे तो खवय्यांच्या पसंतीला उतरेल, याची खात्री संशोधन केंद्राला आहे. कोकणवासीयांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी हे वाण उपयुक्त ठरणार आहे
यंत्राशिवाय काजूगर◼️ ओले काजूगर सर्वांनाच आवडतात. परंतु बी मधून गर काढणे अवघड असते. शिवाय काढणाऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात.◼️ मात्र, वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्रात विकसित केलेले 'वेंगुर्ला १०' हे वाण सर्व दृष्टींनी फायदेशीर आहे.◼️ कोणत्याही यंत्राशिवाय काजूगर काढता येणार आहे, अवघ्या १८ ते २० सेकंदात गर काढता येणार आहे.◼️ सर्व स्तरावरील प्रात्यक्षिकानंतर संशोधन केंद्रातर्फे दोन हजार कलमे तयार करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.◼️ काजूगर काढणाऱ्याच्या त्वचेला होणारी इजा 'वेंगुर्ला १०'मुळे होणार नसल्याने हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरण्यास वेळ लागणार नाही.
अधिक वाचा: मराठवाडा कृषी विद्यापीठाचे बाजरी पिकात मोठे यश; लोहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या 'या' दोन वाणांना मान्यता
Web Summary : Konkan Agricultural University developed 'Vengurla 10,' a cashew variety for easy, যন্ত্র-free shelling. It features thin shells, low oil content, and high yield, starting from the third year, ideal for fresh consumption and processing. Farmers will soon get saplings.
Web Summary : कोंकण कृषि विश्वविद्यालय ने 'वेंगुर्ला 10' नामक एक काजू किस्म विकसित की है, जिसे आसानी से बिना मशीन के छिला जा सकता है। इसमें पतले छिलके, कम तेल की मात्रा और तीसरी वर्ष से शुरू होने वाली उच्च उपज है, जो ताज़ा खपत और प्रसंस्करण के लिए आदर्श है। किसानों को जल्द ही पौधे मिलेंगे।