Lokmat Agro >स्मार्ट शेती > Kharif Seed शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी

Kharif Seed शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी

Kharif Seed Farmers should be careful before buying seeds | Kharif Seed शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी

Kharif Seed शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी

कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यः साधारण महत्व आहे. कृषी निविष्ठांमध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, व कीटकनाशके या निविष्ठांचा समावेश होतो. बियाणे पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावते.

कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यः साधारण महत्व आहे. कृषी निविष्ठांमध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, व कीटकनाशके या निविष्ठांचा समावेश होतो. बियाणे पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावते.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यः साधारण महत्व आहे. कृषी निविष्ठांमध्ये प्रामुख्याने बियाणे, खते, व कीटकनाशके या निविष्ठांचा समावेश होतो. बियाणे पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावते.

सदर निविष्ठांच्या उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक व वाहतूक इ. गुणवत्ता नियंत्रणासाठी राज्यात बियाणे कायदा १९६६, कीटकनाशके कायदा १९६८, खते नियंत्रण आदेश १९८५ हे कायदे राबविले जातात. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी शेती निविष्ठा खरेदी करताना योग्यप्रकारे काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

बियाणे खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
• गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्या.
• बनावट/भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा.
• पावतीवर बियाण्याचा संपुर्ण तपशिल जसे पीक, वाण, संपुर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमुद करावे.
• तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी.
• खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
• खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. बियाण्याची निवड हि जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी.
• भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकीटे सिलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करा.
• बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहून घ्या.
• कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.
• कोणतेही प्रमाणित बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाण्याचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग किती वजनाचा आहे, पॅकिंगची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत का ते पहावे व हे पाहूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे.
• खरेदी केलेल्या बियाण्याची पावती, बियाण्याचे रिकामे पॅकिंग ह्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवाव्यात. तसेच बाजारात सिलबंद बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणित बियाण्याच्या पिशवीला दोन टॅग असतात अशा निळ्या रंगाचा डबल लेबल पाहूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे.
• प्रमाणित बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूने आतून व्यवस्थित शिवलेली आहे का ते पहावे व बियाण्याची पिशवी शिलाई च्या बाजूने न फोडता त्याच्या विरुद्ध बाजूने फोडावी.
• शेतकऱ्यांनी बियाण्याच्या तक्रारीबाबत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात संबंधीत तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी अथवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावा.
• शेतकऱ्याने कमी अंकुरणाबाबतची तक्रार पेरणी केल्यापासून १० दिवसाच्या आत कृषि विभागाकडे दाखल करावी, बियाणे उत्पादकाने केलेल्या दाव्याविरुध्द किड पडण्याच्या व रोग होण्याच्या शक्यतेसंबंधीची तक्रार अशी घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दाखल करावी, जनुकीय अशुध्दतेच्या बाबतीतील तक्रार पिक ५० टक्के फुलोरा अवस्थेत आल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत किंवा योग्य टप्प्यावर दाखल करावी आणि अनुकूलन अक्षमतेच्या बाबतीतील तक्रार पिकाच्या योग्य टप्प्याला दाखल करावी.

अधिक वाचा: Kharif Sowing शेतकऱ्यांनो खरीप पेरणीसाठी बियाण्याची कशी कराल तयारी

Web Title: Kharif Seed Farmers should be careful before buying seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.