Join us

जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:00 IST

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी.

पारंपारिक पध्दतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानानुसार करावी.

जुन्या बागांचे व्यवस्थापन

  • खूप जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतीयांश उंचीवर करावी.
  • कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी १२ ते १५ फुट उंचीवर करावी.
  • छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरोपायरीफॉस कीटकनाशक ५ मि. ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाडावर फवारून झाड भिजवून घ्यावे तसेच कीटकनाशकाचे द्रावण छाटणी केलेल्या झाडांच्या मुळांमध्ये देखील ओतावे.
  • त्यानंतर १ लिटर ब्लॅक जपान डांबराच्या द्रावणामध्ये २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावे.
  • छाटणी केल्यानंतर सुरुवातीच्या काळात झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
  • नवीन फुटवे आल्यानंतर दोन आठवड्यांनी ३ ते ५ फुटवे ठेवून नवीन फुटव्यांची विरळणी करावी.
  • पहिली विरळणी केल्यानंतर, छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरवात झाल्यावर दर एक फुटावर एक याप्रमाणे खोडाच्या सर्व बाजूला फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत.

घन लागवड व्यवस्थापन

  • घन लागवड (५ x ५ मी. किंवा ६ x ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करावी.
  • या मध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे.
  • वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा.
  • घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८०% इतकी ठेवावी.

अधिक वाचा: एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

टॅग्स :आंबापीकफळेफलोत्पादनकोकणविद्यापीठशेतीशेतकरी