महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीने महाराष्ट्रातील रब्बीज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे.
ज्वारीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी उपयुक्त वाण१) फुले मधुर (हुरडा)◼️ ही जात ज्वारीच्या हुरड्यासाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे.◼️ या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसात तयार होतो.◼️ या जातीचे हुरडा उत्पादन ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ हुरडा चवीला उत्कष्ट.◼️ खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
२) फुले पंचमी (लाह्या)◼️ ही जात ज्वारीच्या लह्यांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे.◼️ ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते.◼️ या जातीपासून पांढऱ्या शुभ्र, पुर्ण फुललेल्या लाह्या तयार होतात.◼️ या वाणामध्ये लाह्या तयार होण्याचे प्रमाण ८७.४ टक्के इतके आहे.◼️ या वाणापासून धान्य उत्पादन १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ कडब्याचे उत्पादन ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
३) फुले रोहीणी (पापड)◼️ ही जात ज्वारीच्या पापडांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे.◼️ ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते.◼️ पापडाचा रंग लालसर विटकरी असून खाण्यासाठी कुरकुरीत व चवदार आहे.◼️ खोडमाशी, खोडकिडा व मावा या किडीस तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.◼️ पाण्याचा ताण सहन करते.◼️ या वाणापासून धान्य उत्पादन १८ ते २० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ कडब्याचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.◼️ हा वाण पश्चिम महाराष्ट्राकरिता पापडासाठी शिफारस केला आहे.
अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा विक्रम, तब्बल ३२ लाख लाभार्थ्यांची निवड; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
Web Summary : Mahatma Phule Agricultural University recommends three improved sorghum varieties for specific processed foods: Phule Madhur for hurda, Phule Panchami for lahiya, and Phule Rohini for papad. These varieties offer disease resistance and high yields.
Web Summary : महात्मा फुले कृषि विश्वविद्यालय ने ज्वार के तीन उन्नत किस्मों की सिफारिश की है: हुरडा के लिए फुले मधुर, लाई के लिए फुले पंचमी और पापड़ के लिए फुले रोहिणी। ये किस्में रोग प्रतिरोधी और उच्च उपज देने वाली हैं।