Join us

पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ करायची असेल तर करा या तंत्राने पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:26 IST

अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो.

अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो.

तसेच काही ठिकाणी अति प्रमाणात पाऊस होतो अशावेळी पाण्याचा निचरा होणे महत्वाचे आहे. यासाठी बीबीएफ म्हणजेच Broad Bed and Furrow  BBF (रुंद वरंबा सरी) पद्धत ही शाश्वत उत्पादनाची दिशा दाखवते.

बीबीएफ म्हणजे काय?बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने जमिनीची मशागत करून बियाण्याची पेरणी करणे. या पद्धतीत शेतात सुमारे ६० सेमी. रुंद वरंबा आणि ३० सेमी. सरी अशा रचनेने शेताची रचना केली जाते. ही रचना बीबीएफ यंत्राच्या मदतीने तयार होते.

या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये१) सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका, हरभरा आदी पिकांसाठी उपयुक्त.२) अवर्षणप्रवण क्षेत्रात प्रभावी उपयोग, कारण जलसंधारण सहज साधता येते.३) अति पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होतो.४) बियाणे, खते यात २०-२५% बचत, त्यामुळे निविष्ठा खर्च कमी.५) २५ ते ३०% पर्यंत उत्पादनात वाढ.

तांत्रिक फायदे१) उताराच्या आडवी पेरणीमुळे जलसंधारण सुधारते, माती व पाणी दोन्ही साठते.२) पावसाचा खंड असला, तरी पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते.३) जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून वाहून जाते, झाडांना पाणी साचत नाही.४) पिकाला भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे रोपे जोमदार वाढतात.५) आंतरमशागत व फवारणी करणे सोपे तसेच ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्र वापरता येते.६) मातीची धूप कमी होते आणि तिची भुसभुशीतता व सच्छिद्रता वाढते.

बीबीएफ हे एक शाश्वत, खर्चिक बचत करणारे, उत्पादनवाढीस पोषक आणि पर्जन्याधारित शेतीस पूरक असे अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान आहे.

योग्य नियोजनाने याचा अवलंब केल्यास शेतकरी बांधवांना हवामान बदलाशी सामना करत उत्तम उत्पादन घेता येईल.

अधिक वाचा: शेतकऱ्यांना कर्ज देताना खरच सिबिल स्कोअरची गरज आहे का? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपेरणीखरीपपीकपाऊसदुष्काळसोयाबीनतूरमूगकापूसमका