Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

How to recognize a scorpion bite? How to avoid scorpion sting | शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश

पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो.

पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो.

शेअर :

Join us
Join usNext

संजय पाटील
पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो. काहीवेळा तो जीवघेणा ठरतो, तर काहीवेळा सुदैवाने वेदनांवर निभावते.

ग्रामीण भागात सापांचा वावर नवीन नाही. शेतात तसेच झुडुपांमध्ये साप हमखास असतातच, आपल्याकडे आढळणाऱ्या सापांपैकी बहुतांश साप बिनविषारी आहेत. त्यांनी दंश केला तरी त्याचा मानवी शरीरावर म्हणावा तेवढा फरक पडत नाही. बिनविषारी सापाने केलेल्या दंशाला वैद्यकीय भाषेत 'ड्राय बाईट' म्हणून ओळखले जाते.

मात्र, विषारी सर्पाने दंश केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, तर दंश झालेल्या व्यक्तीच्या जिवावरही बेतू शकते. घोणस, फुरसे, मण्यार, पोवळा, नाग, चापडा हे सर्प विषारी आहेत, तर धामण, दिवड, पाणदिवड, गवत्या, कुकरी, तस्कर, कवड्या, मांडूळ, डुरक्या घोणस हे साप बिनविषारी आहेत.

सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. मुळात आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही.

उपचाराअंती या वेदना शमतात. मात्र, लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो.  या विंचूला घातक समजले जाते. लाल विंचूचा दंश विषारी असतो. वेळेत वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असते.

सर्पदंश लक्षणे
जखम होणे, अस्पष्ट दिसणे, लालसरपणा, सूज चढणे जखमेजवळ वेदना होणे, दरदरून घाम सुटणे श्वास घेताना त्रास अन्न गिळताना त्रास पोटदुखीसह ताप येणे

सर्पदंश टाळण्यासाठी
• गवतातून चालताना पायात बूट घालावेत.
• नडगी व पोटरीचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधावीत.
• शिळे अन्न घराजवळ टाकू नये.
• दगडांमधील फटी, सांदीमध्ये बोट रुतविताना काळजी घ्यावी.
• घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे.
• झाडाच्या फांद्या किंवा वेली खिडक्यांपासून दूर ठेवाव्यात.

विंचू दंश झाल्यास आढळणारी लक्षणे
काळा विंचू

• दंशाच्या जागेवर असह्य वेदना होतात.
• त्या जागेपासून वेदना वर चढत जाते.
• दंशाच्या ठिकाणी जास्त घाम येतो.
• स्नायूंची थरथर जाणवायला सुरुवात होते.
• रक्तदाब थोडाफार वाढू शकतो.
• नाडीचा वेग थोडा मंदावतो.

लाल विंचू
• देश झाल्यास फुफ्फुसाला सूज येते.
• विषामुळे उलट्या होतात.
• व्यक्तीला दरदरून घाम येतो.
• दम लागण्यास सुरुवात होते.
• हातपाय थड पडत जातात.
• खोकल्यातून रक्तस्राव होतो.

विंचवांचा प्रतिबंध
• विंचवांचा प्रादुर्भाव छप्पर, जुने कपडे, चपला, बूट, अडगळीत असतो.
• घर कौलारू असल्यास छताखाली लाकडी सिलिंग असणे उपयोगी ठरते.
शेतीकाम करताना हातात जाड कापडी मोजे वापरणे चांगले.
• गुंडाळून ठेवलेले अंथरुण, पांघरुण नीट पसरून पाहून झोपावे.
• जुनी घरे, झोपड्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी.

Web Title: How to recognize a scorpion bite? How to avoid scorpion sting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.